जिल्हा दूध संघातर्फे रोज ७६ हजार लिटर दुधाचे संकलन होते. तर त्या तूलनेत वितरण केवळ २८ ते ३० हजार लिटर एवढेच आहे. उर्वरित ४० हजार लिटर दुध हे मुंबईला पाठविण्यात येत आहे. संकलन आणि वितरणातील समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे दुधाच्या वितरणावर मोठा परिणाम जाणवला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हा दूध संघातर्फे वितरित होणाऱ्या दुधाच्या किंमती प्रतिलिटर दोन रुपयांने कमी केल्या आहेत. गेल्या काही महिन्यापासून दुध संकलनात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्या तुलनेत वितरण घटले आहेत. विक्रीला चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा दुध संघाचे व्यवस्थापक पी. बी. पाटील यांनी "सकाळ' सांगितले.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
जिल्हा दूध संघातर्फे रोज ७६ हजार लिटर दुधाचे संकलन होते. तर त्या तूलनेत वितरण केवळ २८ ते ३० हजार लिटर एवढेच आहे. उर्वरित ४० हजार लिटर दुध हे मुंबईला पाठविण्यात येत आहे. संकलन आणि वितरणातील समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
यामुळे ४६ रुपये लिटरने विक्री होणारे देवगिरी महानंद दूध आता ४४ रुपये लिटरने विक्री होत आहे. तर पूर्वी २३ रुपयात अर्धा लिटर दुध विक्री होत होते. ते आता २२ रुपयात अर्धा लिटर विक्री होत आहे. यासह आता जिल्हा दुध संघातर्फे देवगिरी गोल्डची विक्री सुरु केली आहेत. याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. दर कमी झाल्यामुळे खरेदी वाढली असल्याचेही श्री. पाटील यांनी सांगितले.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
(संपादन-प्रताप अवचार)