SSC RESULT : औरंगाबाद विभागातील मुलीच हुश्‍शार..! मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी ३.१ ने जास्त 

संदीप लांडगे
Wednesday, 29 July 2020

दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतू, यंदा कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून विद्यार्थी आणि पालकांचे संपुर्ण लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. अखेर बोर्डाने बुधवारी दहावीचा निकाल जाहीर केला. 

औरंगाबाद :   राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी (ता.२९) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यामध्ये औरंगाबाद विभागाचा सरासरी निकाल ९२ टक्के इतका लागला आहे. इतर विभागाच्या तुलनेत औरंगाबाद विभाग हा नेहमी प्रमाणे शेवटच्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे यंदाही विभागातून मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. 

ऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...   

दरवर्षी दहावीचा निकाल हा साधारण जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो. परंतू, यंदा कोरोनामुळे सर्वच निकालांना उशीर झाला आहे. मागील तीन महिन्यांपासून विद्यार्थी आणि पालकांचे संपुर्ण लक्ष दहावीच्या निकालाकडे लागले होते. अखेर बोर्डाने बुधवारी दहावीचा निकाल जाहीर केला. 

प्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..! 

६२४ केंद्रावर घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेला औरंगाबाद विभागातून एक लाख ८५ हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी एक ८४ हजार ७६४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी एक लाख ६९ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

Breaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम 

भूगोलच्या पेपरमुळे निकालावर परिणाम
यावर्षी दहावीची लेखी परीक्षा ३ मार्च ते २३ मार्च या काळात घेण्यात आली होती. यामध्ये शेवटचा पेपर भुगोलाचा होता, पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा पेपर रद्द केला होता. २४ मार्चपासून सुरु झालेल्या लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका पोस्टामध्येच अडकून पडल्या होत्या. लॉकडाऊनमुळे उत्तरपत्रिका तपासणी आणि त्यांचं विभागीय मंडळातील संकलन हे एक मोठं आव्हान मंडळापुढे होतं.

कोरोना बाधित रुग्णांना काजू अन् अक्रोडचा खुराक   

त्यातच भुगोल विषयांचं गुणदान कसं करायचं हा एक मोठा प्रश्न मंडळापुढे होता. या विषयाबाबत मंडळाने निर्णय घेत बाकीच्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्याचं रुपांतर हे रद्द झालेल्या भुगोल पेपरच्या गुणांमध्ये करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. यामुळे दहावीच्या गुणदानाचा तिढा सुटला. 

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन 
विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रतीसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 

(संपादन- प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Division SSC Result Top in Girl