घंटा वाजली : औरंगाबादेत पहिल्याच दिवशी ४०६ शाळांमध्ये १७ हजार विद्यार्थी, १७९ शाळा बंद 

संदीप लांडगे
Tuesday, 24 November 2020

कोरोनानंतर सोमवारी (ता.२३) जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागातील ५८५ पैकी १७९ शाळा बंदच होत्या. ४०६ शाळांमध्ये पहिल्या दिवशी १७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. 

औरंगाबाद : कोरोनानंतर सोमवारी (ता.२३) जिल्ह्यातील शाळा सुरु झाल्या. ग्रामीण भागातील ५८५ पैकी १७९ शाळा बंदच होत्या. ४०६ शाळांमध्ये पहिल्या दिवशी १७ हजार २७५ विद्यार्थ्यांनी शाळेत हजेरी लावली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर मार्चपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या. आठ महिन्यानंतर ग्रामीण भागातील माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शाळांची घंटा सोमवारी (ता.२२) वाजली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून शाळा सुरू करण्यापूर्वी शाळांमध्ये वर्ग खोल्यांची स्वच्छता, निजंर्तुकीकरण करण्यात आले होते. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

ग्रामीणमध्ये एकूण ५८५ शाळा 
सर्व शिक्षकांना कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. ज्या शिक्षकांनी तपासणी केली आहे. त्या शिक्षकांना प्रमाणपत्र सादर करुन हजर राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ५० टक्के शिक्षक बहुतांश शाळेत हजर होते. ग्रामीणमध्ये एकूण ५८५ शाळा आहेत. ज्यापैकी सोमवारी ४०६ शाळा सुरु झाल्या असून, १७९ शाळा सुरु झाल्या नसल्याचे माध्यमिक शिक्षण विभागाने म्हटले आहे. तर उपस्थित विद्यार्थी संख्या ही १७ हजार २७५ होती. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

५० टक्के उपस्थितीबाबत शासन नियमाची पायमल्ली 
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने ३०० शाळांना भेटी दिल्याचा दावा केला. गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगला येथे शिक्षण सभापती अविनाश गलांडे यांनी पाहणी केली असता शाळा सुरुच नव्हती. याची माहिती मिळताच प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जयस्वाल देखील शाळेत आले त्यांनी पाहणी करुन कारणे दाखवा नोटीस संबंधीत शिक्षकांना बजावण्यात येणार असून, पुढील कारवाई ही अहवाल सादर झाल्यानंतर करण्यात येईल असे म्हटले आहे. नियमानुसार माध्यमिकचे वर्ग प्रत्यक्ष सुरु असले तरी प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी ५० टक्के शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे ऑनलाइन, ऑफलाइन समुह पद्धतीने शिक्षण सुरु ठेवणे आवश्यक होते. दिलेल्या आदेशानुसार शाळा सॅनिटाइज करणे, स्वच्छ करणे आवश्यक होते. पण शाळेसमोर डबके साचल्याचे दिसून आले. वाळूजमध्ये तर जिल्हा परिषद हायस्कुल मध्ये माध्यमिकचे १३ पैकी १२ शिक्षक हजर होते. माध्यमिकमध्ये विद्यार्थी संख्या ४२५ आहे त्यापैकी केवळ एकच विद्यार्थी शाळेत उपस्थित असल्याचे दिसून आले. 

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad first day school Attendance 17 thousand student 179 schools close