औरंगाबादमध्ये तरुणाने तब्बल अर्धा फूट लांबीचा टूथब्रश गिळला आणि नंतर...

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 30 December 2020

रुग्णाने ब्रश नेमका का गिळला आणि कशाप्रकारे गिळला? हा प्रश्न डॉक्टरांना पडला होता

औरंगाबाद: कधी-कधी अशा बातम्या कानांवर येत असतात की त्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं. अशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. पोटदुखीचा त्रास होत आहे म्हणून एक जण हॉस्पिटलमध्ये गेला असता तपासणीनंतर डॉक्टरही चक्रावले आहेत. त्या रुग्णाच्या पोटात चक्क दात घासायचा ब्रश म्हणजे टूथब्रश असल्याचं निदर्शनास आल्यावर डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला. 

33 वर्षीय तरुणाने ब्रश गिळला होता. रुग्णाने ब्रश नेमका का गिळला आणि कशाप्रकारे गिळला? हा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. पण परिस्थिती पाहून शेवटी डॉक्टरांनी 33 वर्षीय रुग्णावर सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. शेवटी ऑपरेशन करून डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातील टूथब्रश काढला. हे ऑपरेशन जवळपास दीड तास सुरु होते. सध्या त्या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.

'हर्षवर्धन जाधवांचे राजकारणात 'कमबॅक', ग्रामपंचायतच्या निकालातून देणार उत्तर'

रुग्णाच्या पोटात दुखू लागल्याने तो हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. औरंगाबाद येथील शासकीय घाटी रुग्णालयात रुग्णाला दाखल केलं होतं. डॉक्टरांनी सिटीस्कॅन केलं असता त्याच्या पोटात लांबलचक टूथब्रश असल्याचं आढळलं. पोटात टूथब्रश पाहून डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. हा ब्रश जवळपास अर्धा फूट लांबीचा होता, असं डॉक्टरांनी सांगितलं.

ही शस्त्रक्रिया अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर, शस्त्रक्रिया विभागप्रमुख डॉ. सरोजिनी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शल्यचिकित्सा पथक क्रमांक-६ चे प्रमुख जुनेद एम. शेख, डॉ. अविनाश घाटगे, डॉ. ओमर खान, डॉ. संदीप चव्हाण, डॉ.सुकन्या विंचूरकर, डॉ.गौरवभावसार, भुलतज्ज्ञ डॉ. अनिकेत राखूडे,डॉ. विशाखा वाळके, अधिपरिचारिका संतोशी सोनगट्टी यांनी केली.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad a half foot long toothbrush was swallowed