अवकाळी पावसाने झोडपले, झाडे उन्मळून पडली

औरंगाबाद : मुंबई मार्गावर मिटमिटा येथे उन्मळुन पडलेले वडाचे झाड.
औरंगाबाद : मुंबई मार्गावर मिटमिटा येथे उन्मळुन पडलेले वडाचे झाड.

औरंगाबाद -  वातावरणात हवेच्या दाबपट्ट्यांची आंदोलने होत असल्याने अवकाळी पावसाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन दिवसांत दोन दिवस शहरात संध्याकाळच्या सुमारास वादळवारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस बरसला.

यामुळे शहराच्या काही भागात झाडाच्या मोठाल्या फांद्या मोडल्या, मोठाली झाडे उन्मळून पडली तर रस्त्याच्या कडेला असलेले जुनाट खांब वाकण्याच्या घटना शुक्रवारच्या पावसादरम्यान झाल्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

शुक्रवारी (ता.२७) झालेल्या वादळी पावसात शहरात चार ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासमोर सायंकाळी सव्वासातच्या सुमारास झाड कोसळले. या महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहासमोर फुटपाथवर अनेक बेघर भिकारी राहतात. त्या फुटपाथवरच विजेचा जुना पोल वाकडा होऊन आडवा झाला.

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात काही ठिकाणी झाडाच्या मोठाल्या फांद्या मोडून पडल्या. जयसिंगपुरा भागात विद्यापीठाच्या भिंतीलगत लिंबाची मोठी फांदी दुचाकीवर पडल्याने नुकसान झाले. खडकेश्‍वर भागात नंदी वॉईन शॉप, जिल्हाधिकारी निवासस्थानाशेजारी छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तुसंग्रहालय व निराला बाजार येथे झाड उन्मळून पडले. नगरनाका-मिटमिटा रस्त्यावर वडाचे मोठे झाड मुख्य रस्त्यावर उन्मळून पडले. या घटनांत अनुचित प्रकार घडला नसल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. 

दाबपट्ट्यामुळे अवकाळी पाऊस 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख व भौगोलिक वातावरणाचे अभ्यासक डॉ. मदन सूर्यवंशी म्हणाले, की किमान १४ दिवस प्रखर उष्णता असेल तर बाष्पीभवनाचा वेग वाढतो आणि त्या भागात हवेचा कमी दाब निर्माण होतो यामुळे बाष्पयुक्त ढग या दाबाच्या केंद्राकडे ओढले जातात. उष्णतेमुळे हवा हलकी होते आणि वाऱ्याचा वेग वाढतो. यामुळे वातावरणात नैसर्गिक दाब वाढतो. हा दाब एखाद्या ठिकाणी चक्रवात (वावटळ) तयार करतो. हे चक्रवात जमिनीवर तयार होऊन वातावरणात जाते.

जमिनीवरून जाणारी उष्ण आहे आणि थंड ढग यांचे सांद्रीभवन होऊन पाऊस पडतो. हा पाऊस ऑगस्टमध्ये पडणाऱ्या संततधार सरीसारखा नसतो. वातावरणात दाबाचा पट्टा तयार होऊन अवकाळी पाऊस येत असतो. दाबपट्ट्याच्या वातावरणातील आंदोलनामुळे असा अवकाळी पाऊस होत आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com