ऐतिहासिक ५२ दरवाजांच्या वैभवाला मिळणार उजाळा, महापालिकेतर्फे प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन

माधव इतबारे
Tuesday, 26 January 2021

सध्या फक्त १८ ऐतिहासिक दरवाजे अस्तित्वात आहेत. त्यात भडकल गेट, मकाई गेट, बारापुल्ला गेट, महमूद दरवाजा, नौबत दरवाजा, नवंखंडा दरवाजा, काला दरवाजा, रंगीन दरवाजा, दिल्ली गेट, कटकट गेट, रोशन गेट, जाफरगेट, पैठणगेटचा समावेश आहे.

औरंगाबाद : शहराला ५२ दरवाजांचा इतिहास असला तरी यातील अनेक दरवाजे नामशेष झाले आहेत. सध्या चांगल्या स्थितीत असलेल्या दरवाजांची डागडुजीकरून त्यांना पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा महापालिकेचा प्रयत्न सुरू आहे. नामशेष झालेल्या दरवाजांचा इतिहास चित्ररुपाने नागरिकांसमोर येणार आहे. महापालिकेनेतर्फे ५२ ऐतिहासिक दरवाजांची प्रतिकृती बनविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातील ५२ दरवाजे उत्कृष्ट शिल्प व वास्तू कलेचा नमुना म्हणून ओळखले जात होते; पण महापालिका व नागरिकांच्या दुर्लक्षामुळे यातील अनेक दरवाजे आज इतिहासजमा झाले आहेत.

सध्या फक्त १८ ऐतिहासिक दरवाजे अस्तित्वात आहेत. त्यात भडकल गेट, मकाई गेट, बारापुल्ला गेट, महमूद दरवाजा, नौबत दरवाजा, नवंखंडा दरवाजा, काला दरवाजा, रंगीन दरवाजा, दिल्ली गेट, कटकट गेट, रोशन गेट, जाफरगेट, पैठणगेटचा समावेश आहे. नामशेष झालेले दरवाजे व सध्या अस्तित्वात असलेले दरवाजे जुन्याकाळी कसे दिसत होते, हे पुन्हा एकाद नागरिकांनी अनुभयला मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेने अभ्यासकांसाठी प्रतिकृती तयार करण्याची स्पर्धा आयोजित केले आहे. उत्कृष्ट कलाकृतींना प्रथम पुरस्कार २१ हजार, द्वितीय पुरस्कार १५ हजार तर तृतीय पुरस्कार १० हजार व उतेजनार्थ पुरस्कार तीन देऊन गौरविण्यात येणार आहे. कालाकृतीवर महापालिकेचे एकाधिकार राहील. आपली कलाकृती १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत कलादालन महानगरपालिका येथे सादर करावी असे आवाहन सांस्कृतिक अधिकारी संजीव सोनार व कलादालन क्युरेटर हंसराज बनस्वाल यांनी केले आहे.

औरंगाबादच्या ताज्या बातम्या वाचा

असे आहेत निमय
अभ्यासात्क कलाकृतीची साधारण १५ इंच उंची व सम प्रमाणात लांबी व रुंदी व हुबेहूब एक प्रतिकृती बनविणे अपेक्षित आहे. प्रतिकृती पीओपी, लाकूड, सिफोर एक्स, पुठ्ठा, माउंट बोर्ड, धातू, मेण, दगड, मार्बल, फायबर, बांबू, काच आदी माध्यमांचा वापर करून बनविता येतील. याकरिता राज्यातील चित्रकला महाविद्यालय व इतर महाविद्यालय विद्यार्थी, कलावंत, हौशी कलावंतांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
 

Edited - Ganesh Pitekar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Historical Gates Get Its Glorious Now Aurangabad News