औरंगाबादच्या लासूर स्टेशनवर जनशताब्दी एक्स्प्रेस डाव्या संघटनांनी रोखली, केंद्र सरकारचा केला निषेध

अविनाश संगेकर
Thursday, 18 February 2021

पन्नासवर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व सुटका न करता सर्वांना औरंगाबाद रेल्वे पोलिस मुख्यालयात नेण्यात आले.

लासूर स्टेशन (जि.औरंगाबाद) : लासूर स्टेशन (ता.गंगापूर) येथे किसान सभा, लाल बावटा शेतमजूर युनियन, जिल्हा धरणग्रस्त समिती, सम‌ृ्द्धी महामार्ग विरोधी कृती समिती, जनआंदोलन संघर्ष समिती व भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने गुरुवारी (ता.18) लासूरच्या रेल्वेस्थानकावर जनशताब्दी एक्सप्रेस अडवत रेल रोको आंदोलन करण्यात आले आहे. 49 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.

केंद्र सरकारने आणलेले तिन्ही कृषी कायदे रद्द करावे. तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कॉ. राम बाहेती, कॉ. कैलास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी हे आंदोलन केले. यावेळी केंद्र सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संताप व्यक्त करण्यात आला आहे. पन्नासवर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले व सुटका न करता सर्वांना औरंगाबाद रेल्वे पोलिस मुख्यालयात नेण्यात आले.

 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Live News Jan shatabdi Express Stopped At Lasur Station By Left Organisations