शेतमाल फेकून दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची भाजीमंडईला भेट, कोरोना नियम पाळण्याच्या दिल्या सूचना

Aurangabad Live Updates
Aurangabad Live Updates

औरंगाबाद : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजीमंडई सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर बाजार समिती बाहेर शेतकरी शेतमाल घेऊन येत आहेत. काही शेतकऱ्यांनी शेतमाल फेकून दिल्याच्या घटना घडल्या असतानाच या घटनेनंतर आज शुक्रवारी (ता.१२) जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी बाजार समितीला भेट  दिली. या भेटी दरम्यान सभापती राधाकिसन पठाडे, जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील प्रतिनिधी बाजार समितीचे अधिकारी यांच्याकडून बाजार समितीची माहिती मागवली व भाजी मंडई भरवता येईल का यावर उपाय योजनांबाबत चर्चा श्री चव्हाण यांनी केले.

बाजार समितीत गर्दी होऊ देऊ नका. काळजी घ्या विनामास्क, नियम न पाळणार्‍यांवर गुन्हे दाखल करा, अशा विविध सूचनाही यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या. यावेळी महापालिकेचे घनकचरा व्यवस्थापन नंदकिशोर भोमबे, पदाधिकारी उपस्थित होते. जाधववाडी मधील फळे भाजी मार्केट बंद राहिल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ती बंद ठेवू नये, अशी मागणी शेतकरी संघटनेतर्फे बाजार समितीकडे करण्यात आली होती. आज बाजार समितीतर्फे शेतकऱ्यांच्या मागणीचे पत्र जिल्हाधिकारी चव्हाण यांना देण्यात आले.याविषयी त्यांनी महापालिकेच्या मोकळ्या जागा व मैदानावर भाजी मंडई सुरू करता येईल का व इतर काही उपाययोजना करता येईल. याविषयी महापालिका व बाजार समितीच्या अधिकाऱ्यांनी चर्चा करावी, अशी सूचना केली.

बाजार समितीमधील गर्दी नियंत्रणाचे काम समिती प्रशासनाचे
जिल्हाधिकारी बाजार समितीमधील भाजी मंडई होणारी गर्दी रोखण्याचे काम बाजार समिती प्रशासनाच्या आहे. हे काम पोलिस अधिकारी किंवा जिल्हाधिकारी प्रशासनाचे नाही. यामुळे अधिकारी वाढवा लोकांना समजून सांगा. जनजागृती करा ऑडिओ व स्पीकरच्या माध्यमातून सर्वांना कोरोनापासून वाचविण्याचे नियम सांगा. ना ऐकणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करा अशा स्पष्ट सूचना ही यावेळी श्री.चव्हाण यांनी दिल्या


संपादन - गणेश पिटेकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com