देगलूर येथे मार्चमध्ये मराठवाडा साहित्य संमेलन 

file photo
file photo

औरंगाबाद - मराठवाडा साहित्य परिषदेचे 41 वे मराठवाडा साहित्य संमेलन देगलूर (जि. नांदेड) येथे होणार आहे. येत्या मार्चमध्ये हे संमेलन होईल, अशी माहिती साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.

 त्यांनी पत्रकात म्हटले की, मराठवाडा साहित्य परिषदेच्या देगलूर शाखेकडून 41 वे साहित्य संमेलनाचे यजमानपद स्वीकारण्याची तयारी दर्शवणारे पत्र परिषदेला देण्यात आले होते; तथापि उस्मानाबाद येथे नुकतचे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले. यामुळे मराठवाडा साहित्य परिषदेचे संमेलन डिसेंबरमध्ये होऊ शकले नाही.

देगलूर शाखेचे निमंत्रण स्वीकारून आता हे संमेलन मार्च 2020 मध्ये घ्यावे असे देगलूर शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण मलगीरवार यांना कळवले आहे. 
वाचून तर बघा : नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या बाराव्या पिढीत सध्या कोण काय करतेय, वाचा... 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com