याचा कार्यक्रमच केला असता..! मनसे जिल्हाध्यक्षाचा संताप, अतिरिक्त आयुक्तांवर उगारली खुर्ची 

माधव इतबारे
Friday, 26 June 2020

रोज दोनशे-अडिचशेच्या संख्येत रुग्णांची संख्या वाढत असेल तर महापालिका प्रशासन काय करतेय? यांना जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. महापालिकेचे सुरू असलेले काम निंदणीय आहे. त्यामुळे शासनाने आणखी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. आज हा वाचला, त्याचा तर कार्यक्रमच केला असता. पुढेही आंदोलने केली जातील, असा इशारा दाशरथे यांनी दिला. 

औरंगाबाद : शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना महापालिकेचे अधिकारी, डॉक्टर मात्र एसी दालनात बसून आहेत. कोरोनामुळे गेलेल्या बळींना जबाबदार कोण? असा जाब विचारत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांच्या अंगावर शुक्रवारी (ता. २६) दुपारी खुर्ची उगारल्याने खळबळ उडाली. 

पालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले  
शहरात कोरोनाचा संसर्ग रोखण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाना जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी एकत्र आले आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उडी घेतली आहे. जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शुक्रवारी दुपारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम यांची भेट घेतली.

धक्कादायक..! औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..!

यावेळी श्री. दाशरथे यांनी महापालिका आयुक्त फोन घेत नाही. एकही अधिकारी रस्त्यावर उतरून काम करत नाही. सर्व अधिकारी एसी दालनात बसून आहेत. प्रशासक फोन घेत नाहीत. आत्तापर्यंत गेलेल्या बळींना जबाबदार कोण? असा जाब विचारला. तुम्ही काय करणार आहात? अशी विचारणा त्यांनी निकम यांना केली. निकम यांनी प्रशासक सध्या क्वारंटाईन आहेत. मोबाईलवरून त्यांचे काम सुरू आहे. प्रशासन योग्य त्या उपाय-योजना करत आहे, असा खुलासा केला.
 

सावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..!  

ही चर्चा सुरू असताना संतप्त होत दाशरथे यांनी खुर्ची उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांना सुरक्षारक्षकांनी रोखले व दालनाच्या बाहेर आणले. या प्रकाराने महापालिकेत काही काळ तणाव निर्माण झाला होता. एक कार्यकर्ता कुंभकर्णाच्या वेशभूषत आला झाला होता. गजन गौडा पाटील, संदीप कुलकर्णी, प्रविण मोहिते, अमित भांगे, अमित दायमा, वृषभ रगडे उपस्थित होते. 

ही पक्षिणी होते ‘होम क्वारंटाइन’ कशासाठी वाचा...!  

याचा कार्यक्रमच केला असता... 
पत्रकारांसोबत बोलताना दाशरथे म्हणाले, रोज दोनशे-अडिचशेच्या संख्येत रुग्णांची संख्या वाढत असेल तर महापालिका प्रशासन काय करतेय? यांना जाब विचारण्यासाठी आम्ही आलो होतो. महापालिकेचे सुरू असलेले काम निंदणीय आहे. त्यामुळे शासनाने आणखी अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी. आज हा वाचला, त्याचा तर कार्यक्रमच केला असता. पुढेही आंदोलने केली जातील, असा इशारा दाशरथे यांनी दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad MNS district president raised the chair on the additional commissioner