esakal | औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : हद्द वाढविल्याने आकार वाढला 
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : हद्द वाढविल्याने आकार वाढला 

वॉर्डाची हद्द वाढविण्यात आल्याने आकार वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्याचा विकासकामांवर परिमाण होऊ शकतो. मागील निवडणुकीत या वॉर्डात शिवसेनेचे प्राबल्य होते. आता हा वॉर्ड ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे. 

औरंगाबाद महापालिका निवडणूक 2020 : हद्द वाढविल्याने आकार वाढला 

sakal_logo
By
शेखलाल शेख

गणेशनगर : वॉर्ड क्रमांक ४३ 

मागील निवडणुकीत या वॉर्डाचा ४० क्रमांक होता. आता नवीन रचनेत या वॉर्डाला ४३ क्रमांक मिळाला आहे. वॉर्डाची हद्द वाढविण्यात आल्याने आकार वाढल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्याचा विकासकामांवर परिमाण होऊ शकतो. मागील निवडणुकीत या वॉर्डात शिवसेनेचे प्राबल्य होते. आता हा वॉर्ड ओबीसी महिलेसाठी राखीव झाला आहे.

हेही वाचा : रस्त्यावर वाहने उभी करताय, आता मोजा एवढे पैसे

अशी आहे रचना 

उत्तर : वीर सावरकर चौक ते लहुजी वस्ताद साळवे चौकापर्यंत २४ मी. रुंद मुख्य डांबरी रस्ता 
पूर्व : लहुजी वस्ताद साळवे चौक ते मुख्य रस्तामार्गे गजानन कृपा बिल्डिंग व ओंकार गॅस एजन्सीसमोरील चौक ते हॉटेल सनीपर्यंत ते देवगिरी बॅंक टी जंक्‍शनपर्यंतचा डांबरी रस्ता.

हेही वाचा : १५२ कोटीतून किती रस्ते होणार वाचा...

दक्षिण : जळगाव वळण रस्ता देवगिरी बॅंक टी जंक्‍शनपासून आझाद चौकापर्यंतचा मुख्य डांबरी रस्ता. 
पश्‍चिम : आझाद चौक ते वीर सावरकर चौक मुख्य रस्ता. 

असा आहे वॉर्ड 

लोकसंख्या- ९,९२३ 
अनुसूचित जाती - ६५३ 
अनुसूचित जमाती- २४४ 

मागील वेळेच्या तुलनेत यंदा वॉर्डात चांगले काम झाले आहे. नगरसेवकांचा लोकांशी यंदा चांगला संपर्क राहिला. मात्र, बजरंग चौक ते आझाद चौकापर्यंतच्या रस्त्यावर पावसाळ्यात पुरासारखी परिस्थिती असते. यावर तोडगा निघाला पाहिजे. रस्ता ८० फुटांचा आहे मात्र काँक्रिटीकरण फक्त ३० फुटांचे झाले. त्यामुळे रस्ता छोटा झाला. 
- प्रा. प्रियानंद आगळे 

नवीन रचनेत वॉर्डाचा विस्तार झालेला दिसतो. त्यामुळे विकासकामांवर परिणाम होऊ शकतो. हद्द मोठी असली तरी येथील समस्या सुटत राहिल्या पाहिजेत. 
- नितीन रणखांब