काही भाग जोडला रामनगर वॉर्डात

file photo
file photo

औरंगाबाद : संजयनगर-मुकुंदवाडी (वॉर्ड क्रमांक 81) या वॉर्डात संजयनगर, रोहिदासनगरचा काही भाग, मुकुंदवाडीचा काही भाग, संघर्षनगराचा काही भाग, बंजारा कॉलनीसह रामनगर, तानाजीनगरचा काही भाग येतो. या वॉर्डातील प्रकाशनगर ते गणपती विसर्जन विहिरीपर्यंतचा भाग विठ्ठलनगरात गेला.

यासह संजयनगरातील सर्वच भाग इतर कॉलनीत तोडण्यात आला आहे. यामुळे हा बदल या निवडणुकीत जाणवणार आहे. या बदलाचा परिणाम उमेदवारांवरही होणार आहे. यंदा हा वॉर्ड सर्वसाधारणसाठी सुटलेला आहे. 

असा झाला बदल 
 

  • उत्तर दिशा : जयश्री कॉलनी येथील लक्ष्मणराव डांगे ते दादाराव शेलार यांचे घर. पूर्व दिशा : शेलार यांच्या घरपासून ते पीठगिरणीपर्यंत, सुदर्शन किराणा - संघर्षनगर ते शाहूनगर बुद्धविहार, सिडको विकास योजना रस्त्यावरील टी जंक्‍शनपर्यंत.
  • दक्षिण दिशा : शाहूनगर बुद्धविहारासमोरील विकास योजना रस्त्यावरील टी जंक्‍शन ते संघर्षनगरच्या विकास योजनेपर्यंत.
  • पश्‍चिम दिशा : मिलिंद पाटील यांचे घर ते संत सेना इमारतीसमोरील रस्त्यावरील संघर्षनगर ते कचरू हिवाळे यांचे घर ते शेख अजीज शेख, लक्ष्मणराव डांगे शाळेपर्यंत. 


असा आहे वॉर्ड 

  • लोकसंख्या : 9824 
  • अनुसूचित जाती : 6271 
  • अनुसूचित जमाती : 60 

वॉर्डात सहा ते सात कॉलन्या येतात. या निवडणुकीत काही बदल झाल्यामुळे मतदारसंख्येतही बदल होणार आहे. वॉर्डात रस्त्याचे प्रश्‍न आहेत. ते सुटले पाहिजेत. 
- एकनाथ दाभाडे ,संजयनगर-मुकुंदवाडी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com