खुशखबर ! औरंगाबाद महापालिकेची ७३९ एकर जमीन वाढली ! 

Aurangabad mahapalika.jpg
Aurangabad mahapalika.jpg

औरंगाबाद : हर्सूल व हर्सूल सावंगी तलाव महापालिकेच्या अनेक वर्षांपासून ताब्यात असले तरी या तलावाची शेकडो एकर जमीन महापालिकेच्या नावाने नव्हती. प्रशासनाने प्रयत्न करून या दोन्ही अनुक्रमे ३७० व ३६९ एकर जागा महापालिकेच्या नावावर करून घेतल्या आहेत. जमिनीचा सातबारा महापालिकेच्या नावावर झाल्याचे मालमत्ता अधिकारी तथा विधी सल्लागार अपर्णा थेटे यांनी सांगितले. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
हर्सूल तलाव हा निजाम स्टेटने १९५४ साली बांधला असून, महापालिकेची हद्दवाढ झाल्यानंतर हा तलाव महापालिकेच्या ताब्यात आला. अशीच परिस्थिती हर्सूल सावंगी तलावाची आहे. दोन्ही तलाव महापालिकेच्या ताब्यात असले तरी जमिनीचे सातबारा मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने होते. हर्सूल तलावाची ३७० एकर व हर्सूल सावंगी तलावाची ३६९ एकर जमीन महापालिकेच्या नावे व्हावी, यासाठी महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर जमिनीच्या सातबाऱ्यावर महापालिकेचे नाव लागले असल्याचे श्रीमती थेटे यांनी सांगितले. 

शेकडो एकरवर अतिक्रमण 
तलावाच्या सुमारे ७३९ एकर जागेवर महापालिकेचे नाव लागले असले तरी यातील शेकडो एकर जागेवर अतिक्रमण असण्याची शक्यता आहे. तत्कालीन विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार हर्सूल तलावाच्या जागेची मोजणी करण्यात आली होती. अनेकांनी तलाव परिसरात शेतजमिनीचा ताबा घेतला असल्याचे त्यावेळी समोर आले होते. मात्र मोजणी पूर्ण झाल्यानंतर अहवाल समोर आला नाही. 

महापालिकेची वाढली पत 
महापालिकेच्या शहरात कोट्यवधी रुपयांच्या खुल्या जागा आहेत. समांतर पाणी पुरवठा योजनेसाठी काही जागा महापालिकेला बॅंकेकडे तारण ठेवायच्या होत्या. त्यावेळी मालमत्तांची अंदाजे किंमत मोजण्यात आली होती. सुमारे साडे पाच हजार कोटींची संपत्ती महापालिकेकडे असल्याचे समोर आले होते. त्यात आता ७३९ एकर जमीन महापालिकेच्या नावावर झाल्याने पत वाढली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com