चेहरा बदलला पण कुणाचा : वाचा 

photo
photo

औरंगाबाद : जवाहर कॉलनी वॉर्डामध्ये (क्र. 74) विष्णुनगर, मित्रनगर, अरिहंतनगर, आकाशवाणीचा भाग वाढवून वॉर्ड मोठा करण्यात आला. वार्डची रचना बदलल्यामुळे वॉर्डचा आकार वाढला आहे. वॉर्डची हद्द वाढल्याने पाच ते सात किलोमिटच्या हद्दीचा हा वॉर्ड तयार झाला आहे. 
जवाहर कॉलनी हा स्वतंत्र वॉर्ड होता; मात्र यामध्ये नैसर्गिक रचना बदलून रोडच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या विष्णुनगर, अरिहंतनगर, मित्रनगर आणि आकाशवाणीच्या काही भागाचा समावेश करून वॉर्ड मोठा करण्यात आला. 

असा आहे वॉर्ड 

उत्तर दिशेला जालना रोड, महात्मा बसवेश्‍वर चौक (आकाशवाणी चौक) ते सेव्हन हिल चौक. पूर्व दिशेला सेव्हन हिल चौक ते दक्षिणेकडे जवाहरनगर पोलिस स्टेशन, अपार्टमेंट ते चेतक घोडा चौक. दक्षिण दिशेला जवाहरनगर पोलिस स्टेशनजवळील सिग्नल चौक (शीतल अपार्टमेंट ते चेतक घोडा चौक), पश्‍चिम दिशेला चेतक घोडा चौक ते त्रिमूर्ती चौक ते आकाशवाणी रस्त्याने विश्‍वशंकर मंगल कार्यालय, दुर्गामाता मंदिर ते उत्तर बाजूच्या रस्त्याने श्री. तलवार, श्री. कुबेर यांचे घर ते लिमयेवाडी येथील प्लॉट क्रमांक 12 ते हॉटेल मराठा दरबार ते जालना रोडवरील महात्मा बसवेश्‍वर चौक (आकाशवाणी चौक). 

असा आहे वॉर्ड 
-लोकसंख्या : 11,608 
-अनुसूचित जाती : 802 
-अनुसूचित जमाती : 118 

महापालिकेच्या वॉर्डांची रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. नैसर्गिक हद्दीचा विचार न करता गल्लीबोळांना विखुरण्याचे काम करण्यात आले. भविष्यात विकासकामे करताना वॉर्डाच्या विकासावर परिणाम होणार आहे. 
- प्रशांत साळी 

जवाहरनगर वॉर्डामध्ये लगतच्या अनेक वसाहतींच्या अंशत: भागाचा समावेश केल्याने जवाहर कॉलनीत संपूर्ण विकासकामे होणार नाहीत. एकाच भागासाठी दोन किंवा अधिक नगरसेवक राहिले तर विकासात अडथळे निर्माण होऊ शकतात. 
- कैलास घोंगटे 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com