पाच वर्षे झाली, पाणी कधी येणार...का केला नगरसेविकेने प्रश्न

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद- पाण्यासाठी नागरिकांसह नगरसेवकांची ओरड सुरूच आहे. गुरुवारी (ता. २७) झालेल्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा नगरसेवकांनी पाणीप्रश्‍नावरून प्रशासनाला धारेवर धरले. गेल्या पाच वर्षांपासून दूषित पाण्याचा प्रश्‍न मिटलेला नाही, अशी तक्रार मीना गायके यांनी, तर मुल्ला सलिमा बेगम खाजोद्दीन यांनी पाच वर्षांत पाइप मिळाले नाहीत? आता पाणी कधी येणार, असा प्रश्‍न उपस्थित केला. 

विद्यमान नगरसेवकांची मुदत एप्रिलमध्ये संपत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात तरी वॉर्डातील प्रलंबित कामे व्हावीत यासाठी गुरुवारी नगरसेवक-नगरसेविकांनी कैफियत मांडली. काही नगरसेविकांनी निवडून आल्यापासून तेच ते प्रश्‍न मांडले मात्र अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही, असे सांगून संताप व्यक्त केला. नगरसेविका मीना गायके म्हणाल्या, पुंडलिकनगर वॉर्डातील दूषित पाण्याचा प्रश्‍न पाच वर्षांपासून मांडत आहे. अधिकारी येतात, कुठेतरी खोदून ठेवतात, त्यामुळे प्रश्‍न तर मिटत नाही, मात्र या खड्ड्यात नागरिक पडत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मुल्ला सलिमा बेगम खाजोद्दीन यांनी हमालवाड्यात पाइपलाइन नाही.

मागील पाच वर्षांपासून यासाठी पाठपुरावा करीत आहे. प्रशासनाकडून प्रत्येकवेळी कंपनीकडून पाइप येत असल्याचे उत्तर मिळत आहे. मात्र अद्यापही पाइप आलेले नाहीत. त्यामुळे पाणी कधी मिळणार, असा प्रश्न केला. त्यावर उपअभियंता के. एम. फालक यांनी आठ दिवसांत पाइप येणार असल्याचा खुलासा पुन्हा एकदा केला. महापौरांनी प्रशासनाला आठ दिवसांत पाइप टाकण्याचे काम सुरू केले जाईल, असे लेखी देण्याचे आदेश दिले. आठ दिवसांत काम सुरू झाले नाही तर तुमच्यावरच कारवाई करतो, अशी तंबी महापौरांनी अधिकाऱ्यांना दिली. 
 
शिंदे यांचा आवाज केला बंद 
शिवसेनेला कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजपचे राजू शिंदे सोडत नाहीत. मीना गायके दूषित पाण्याचा प्रश्‍न मांडत असतानाच राजू शिंदे यांनी सत्ताधारी नगरसेविकेच्या वॉर्डातील प्रश्‍नही सुटला नाही, असे नमूद केले. ते पुढे बोलण्याचा प्रयत्न करीत असताना श्रीमती गायके यांनी मी माझ्या वॉर्डाचा प्रश्‍न बरोबर मांडते. तुम्ही मध्ये बोलू नका, असा इशारा शिंदे यांना दिला. त्यामुळे ते जागेवर बसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com