धान्य मिळेल का धान्य... तीन दिवसात १७०० फोन 

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : लॉकडाऊनमुळे गोर-गरिबांचे अन्नपाण्याविना हाल सुरू झाले असून, महापालिकेला गेल्या चार-पाच दिवसात धान्य मिळेल का? अशी विचारणा करणारे तब्बल १७१७ फोन आले आहेत. विशेष म्हणेजे कोरोनासाठी हेल्पलाईन म्हणून दिलेल्या फोन नंबरवर हे फोन येत आहेत. त्यामुळे महापालिकेने मंगळवारपासून (ता. ३१) अन्नदान करण्याचा निर्णय घेतला आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाऊन देशभर लॉकडाऊन करण्यात आला असून तो २१ दिवस म्हणजेच १४ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या लॉकडाऊनमुळे देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक जण अडकून पडले असून, त्यांचे अन्नपाण्याविना हाल सुरू झाले आहेत. शहरातही हीच अवस्था आहे. ज्यांचे हातावरचे पोट आहे, दररोजच्या कमाईतून घरची चूल चालते अशा गरीब, कष्टकरी, कामगारांची उपासमार होत आहे. अशा गरजूंना मदत करण्यासाठी विविध संस्था, संघटना, राजकीय नेते पुढे आले आहेत. मात्र एका दिवसाचे जेवण मिळाले, उद्याचे काय? खरेच कोणी जेवण घेऊन आले नाही तर आपले काय हाल होतील? याची चिंता त्यांना सतावत आहे. त्यामुळे हे सर्वजण अन्नधान्याच्या शोधात आहे.

महापालिका आयुक्त आयुक्‍त अस्तिककुमार पांडेय यांनी अशा गोरगरिबांचा विचार करून काही तरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतःचे एक महिन्याचे तसेच त्यांची पत्नी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी एक महिन्याचे वेतन दिले. तसेच महापौर नंदकुमार घोडेले, नगरसेवक व अधिकाऱ्यांनी देखील गरजूंच्या मदतीसाठी निधी उभा करण्याचा निर्णय घेतला. त्यातून ५५ लाख रुपयांचा निधीही जमा झाला. या रकमेतून अन्नधान्य व आवश्यक धान्य गरजूंना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मेल आयडीवर व महापालिकेतील नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर नोंद करण्याचे आवाहन करण्यात आले. पहिल्याच दिवशी २०० कॉल आले. या सर्वांनी धान्याचीच मागणी केली. त्यामुळे थेट धान्य न देता जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला. असे असले तरी आत्तापर्यंत १७०० पेक्षा अधिक कॉल आले आहेत. प्रत्येकाची मागणी धान्य मिळावे, अशीच आहे. अनेकांनी महापालिका मुख्यालयात खेट्या मारल्या. आता या निधीतून दोन कार्डियाक रुग्णवाहिका खरेदी करण्याचाही विचार सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

धान्य नाही, जेवण देणार 
पालिका आयुक्‍त पांडेय व महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले की, गरजूंना धान्याचे वाटप हे जिल्हा प्रशासनाकडून केले जाणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून जेवणाचे पॉकीट वाटप केल्या जाणार आहेत. मंगळवारपासून हे वाटप सुरू होईल. जेवणासाठी गरजूंनी १८००१२३ ७२५० या क्रमांकावर कॉल करून मागणी करावी. दोन तासांत त्यांना घरपोच जेवण पुरवल्या जातील, असे आयुक्‍तांनी सांगितले. औरंगाबाद फर्स्ट व इस्कॉन कंपनीकडून ही सेवा दिली जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com