कोरोनाच्या धास्तीतही महापालिका करणार हे काम  

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद : कोरोना व्हायरसच्या पार्श्‍वभूमीवर देशभर संचारबंदी लागू असल्यामुळे संपूर्ण कामे ठप्प आहेत; मात्र संचारबंदीच्या काळात आता महापालिकेतर्फे शहरातील नद्यांची साफसफाई व खोलीकरण केले जाणार आहे. महापालिकेचे जेसीबी व पोकलेन सध्या थांबून असून, त्याचा वापर खाम व सुखना नदीसाठी करण्याचा निर्णय मंगळवारी (ता. ३१) घेण्यात आला. कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. 

कोरोना व्हायरसचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली आहे. आरोग्य विभागासह इतर इतर अधिकारीदेखील अलगीकरण, विलगीकरण कक्ष तयार करणे, याठिकाणी अत्यावश्यक सेवा, सुविधांचा पुरविणे अशी कामे करीत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलाच तर अत्यावश्‍यक यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. ही कामे आता पूर्ण झाली आहेत. त्यामुळे महापालिकेने आपला मोर्चा इतर कामांकडे वळविला आहे. मंगळवारी महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी आयुक्त आस्तिककुमार पांडेय, शहर अभियंता सखाराम पानझडे, उपअभियंता ए. बी. देशमुख, शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, सहायक आयुक्त विजया घाडगे यांची उपस्थिती होती. या बैठकीत नद्यांची साफसफाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची यंत्रसामग्री बसून आहे. जेसीबी, पोकलेनचा वापर करून खामनदी व सूखना नदीची सफाई तसेच गरज असल्यास खोलीकरण केले जाणार आहे. ही जबाबदारी कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे यांच्यावर देण्यात आली आहे. 
 
डिझेलचा खर्च संस्थांकडून घेणार 
जेसीबी, पोकलेनसाठी लागणारे डिझेल कंपन्या, संस्थाकडून मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत. कोणी समोर आले नाही तर महापालिकेच्या निधीतून हा खर्च करण्यात यावा, अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत केल्या. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com