तिथे खेळताहेत आता उंदीर आणि साप...

Aurangabad amc news
Aurangabad amc news

औरंगाबाद ः लॉकडाउनमुळे चार महिन्यांपासून उद्यान, खुल्या जागांतील नागरिकांचा वावर बंद आहे. त्यात पावसाळा सुरू झाल्यामुळे झाडे-झुडपे, गवत वाढून खुल्या जागा, उद्यानांना जंगलाचे स्वरूप आले आहे. महापालिकेने देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे घूस, उंदीर तर काही ठिकाणी सापांचा प्रादुर्भाव वाढल्याने शेजारी राहणारे नागरिक मात्र त्रस्त झाले आहेत. 

कोरोना संसर्गामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आले. शहरात संचारबंदी असल्याने तसेच उद्याने, खुल्या जागांमध्ये फिरण्यास नागरिकांनी बंदी घालण्यात आली. दरम्यान, लॉकडाउन शिथिल करण्याचा निर्णय झाल्यानंतर जवळच्या खुल्या जागांमध्ये योगा, व्यायाम करण्यास नागरिकांना मुभा देण्यात आली. मात्र, चार महिन्यांपासून बंद असलेल्या उद्यान, खुल्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात गवत, काटेरी झुडपे वाढली आहेत.

नगरसेवकांनी लाखो रुपये खर्च करून खुल्या जागा, उद्यानांमध्ये जॉगिंग ट्रॅक केले आहेत. हे जॉगिंग ट्रॅकदेखील वाढलेल्या गवतामुळे दिसेनासे झाले आहेत. यंदा पाऊस समाधानकारक असल्यामुळे गवत, झुडपे कंबरेपर्यंत वाढली असून, त्यात जाण्यास कोणी धजावत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, खुल्या जागांमधील झुडपांमुळे उंदीर, घूस यांचा तर काही ठिकाणी सापांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उद्यान, खुल्या जागांशेजारी राहणारे नागरिक यामुळे त्रस्त आहेत. 

कोट्यवधींची सामग्री धूळ खात 
खुल्या जागा व उद्यानांमध्ये नागरिकांना सोयी-सुविधा देण्यासाठी महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यात सभागृहाचे बांधकाम, जॉगिंग ट्रॅक, हायमास्ट, लायटिंग, बसण्यासाठी खुर्च्या, लहान मुलांची खेळणी, ओपन जीमच्या साहित्याचा समावेश आहे. मात्र, हे साहित्य सध्या धूळ खात आहे. जनतेच्या पैशातून उभारण्यात आलेली ही यंत्रणा सध्या महापालिकेच्या दुर्लक्षामुळे धूळ खात पडून, आहे. वेळीच दखल घेतली नाही तर हा खर्च व्यर्थ जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वॉर्ड क्रमांक ७६ सिडको एन-३, एन-४, वॉर्ड क्रमांक ७७, सिडको एन-२ ठाकरेनगर येथे दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी शहर परिवर्तन आघाडीचे राहुल इंगळे यांनी महापालिका प्रशासकांकडे केली आहे. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com