
शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने वाढत असून, काहीअंशी गस्तीतील त्रुटी घरफोड्यांना कारणीभूत आहेत. शहरात दरदिवशी छोट्या-मोठ्या मिळून तीन घरफोड्या होतात. दरदिवशी शहरातून तीन ते चार दुचाकी लंपास होतात. दरदिवशी वाहनचोरीचे तीन गुन्हे हमखास दाखल होतात. हे पोलिसांकडून येणाऱ्या दैनंदिन प्रेसनोटवरून दिसून येते.
औरंगाबाद : शहराचा वाढता विस्तार, अफाट लोकसंख्या, शहरातील वाढती बेरोजगारी, रोजगारासाठी शहरात इतर ठिकाणांहून झालेले स्थलांतर याच्या परिणामातून गुन्हेगारीतही सातत्याने वाढ होत आहे. जबरी चोरी, लूट असो की महिलांचे दागिने हिसकावण्याचे प्रकार यासह चोऱ्या, बलात्काराच्या गुन्ह्यातही वाढ झाली आहे.
शहरात गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून उपाय योजले जात आहेत; परंतु तरीही गुन्हेगारी कमी होण्याऐवजी वाढत आहे. जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 या वर्षात जबरी चोरी, मंगळसूत्र चोरी, बलात्काराच्या घटनांत वाढ झाली. वाहन चोरीचा चोरांनी सपाटाच लावला आहे.
दरदिवशी चारपेक्षा अधिक चोऱ्या
शहरात घरफोडीच्या घटना सातत्याने वाढत असून, काहीअंशी गस्तीतील त्रुटी घरफोड्यांना कारणीभूत आहेत. शहरात दरदिवशी छोट्या-मोठ्या मिळून तीन घरफोड्या होतात. पोलिसांकडे खबऱ्यांचे कमी झालेले प्रमाणही याला कारणीभूत असून, सर्व प्रकारच्या चोऱ्यांचा विचार केल्यास दरदिवशी चारपेक्षा अधिक चोऱ्या शहरात घडतात.
108 घरफोड्यांची उकल बाकी
शहरात नोव्हेंबर 2019 अखेरीस झालेल्या घरफोड्यांपैकी 156 एवढी पोलिसांकडे नोंद आहे. 2018 च्या तुलनेत सात घरफोड्या कमी झाल्या अशी पोलिसांची आकडेवारी आहे. यात केवळ 47 घरफोड्या उघडकीस आल्या. हे प्रमाण 30 टक्के आहे; मात्र अद्यापही 108 घरफोड्यांची उकल झालेली नाही.
आठशे छत्तीस वाहने चोरी
दरदिवशी शहरातून तीन ते चार दुचाकी लंपास होतात. दरदिवशी वाहनचोरीचे तीन गुन्हे हमखास दाखल होतात. हे पोलिसांकडून येणाऱ्या दैनंदिन प्रेसनोटवरून दिसून येते. विशेषत: खासकरून चोरीसाठी सिडको, मुकुंदवाडी, सिटी चौक भाग, एमआयडीसी सिडको, रेल्वेस्थानक, सार्वजनिक ठिकाणांचा समावेश आहे. वर्षभरात एकूण आठशे छत्तीस वाहने लंपास झाली आहेत; परंतु यातील दोनशेच वाहने परत मिळाली आहेत.
हेही वाचा : शाळा बुडविणाऱ्या मुलांच्या मदतीने लागला या बहुचर्चित खूनाचा छडा
बलात्कारात वाढ
वर्ष 2016 मध्ये विनयभंगाच्या 54 घटना गेल्यावर्षीपेक्षा जास्त होत्या. वर्ष 2018 ला बलात्काराच्या 70 घटना घडल्या. यंदा 78 घटना घडल्या असून, दोन घटनांची उकल झालेली नाही. परिचित ओळखीच्या व्यक्तीकडून अत्याचार झाल्याचे या घटनांवरून दिसून येते.
गुन्ह्याचा प्रकार : 2018 : 2019 : फरक
खून | 33 | 34 | एकने वाढ |
खुनाचा प्रयत्न | 71 | 43 | तीसने घट |
जबरी चोरी | 119 | 149 | तीसने वाढ |
मंगळसूत्र चोरी | 20 | 44 | 24 ने वाढ |
सर्व चोऱ्या | 1166 | 1373 | 207 ने वाढ |
वाहनचोरी | 657 | 836 | 179 ने वाढ |
बलात्कार | 70 | 78 | आठने वाढ |
जानेवारी 2019 ते नोव्हेंबर 2019 दरम्यान...
1) जबरी चोरीचे 40 टक्के गुन्हे उकल झाले नाहीत.
2) मंगळसूत्र, गंठण हिसकावल्याचे 70 टक्के गुन्हे उकल नाहीत.
3) 70 टक्के घरफोड्या उकल झालेल्या नाहीत.
4) सर्व चोऱ्यांपैकी 75 टक्के चोऱ्यांची उकल झालेली नाही.
5) वाहनचोरीच्या एकूण 76 टक्के प्रकरणांची उकल झालेली नाही.
6) मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांपैकी 77 टक्के गुन्ह्यांची उकल नाही.
7) सहा प्रकारातील एकूण 2,696 गुन्हे दाखल त्यातील 830 गुन्ह्यांची उकल.
8) या सहा प्रकारांतील एकूण 30.78 टक्के गुन्ह्यांची उकल, 69.22 टक्के बाकी.
हेही वाचा : जिथे काम करीत होता तिथेच ट्रकखाली दबून अभियंत्याचा मृत्यू
हे लक्षात असू द्या
अशा करा उपाययोजना
हेही वाचा : नासाचे कागदपत्रे इंटरनेटवरुन डाऊनलोड करुन त्याने सुरु केला हा "उद्योग'
हेही वाचा : ती नगरहून फक्त या गोष्टीसाठी येत होती औरंगाबादेत