कधी ऐकलं का...पर्यावरणपुरक पोलिस ठाणे! 

Beedikn Police Station
Beedikn Police Station

औरंगाबाद  : रात्रंदिवस डोळ्यांत तेल घालून जनसामान्यांची सुरक्षा करायची, प्रसंगी तहानभूक विसरून चोवीस तास ऊन, थंडीत गस्त घालायची. स्वतःसोबत कुटुंबाकडे आणि आरोग्याकडे दुर्लक्ष तर तिथे स्वतःची निवासस्थाने आणि ठाण्याची व्यवस्था विचारायला नको; पण याला बिडकीन पोलिस ठाणे अपवाद ठरले आहे.

नागरी सुरक्षेसोबतच स्वच्छता, भौतिक सेवा, खेळाची सुविधा, पर्यावरण आणि पाण्याची जाण ठेवून श्रमदान, लोकसहभाग व सामाजिक दायित्वातून पोलिसांनीच ठाण्याचे नंदनवन केले आहे. 

राज्यातील बहुतांश पोलिस ठाण्याची स्थिती दयनीय आहे. काही ठाणी सोडली तर स्वतःची जागाही नाही अशी अनेक ठाणी सापडतील. किरायाच्या जागेत, एखाद्या इमारतीत, इंग्रज, निजामकालीन वास्तूत काही पोलिस ठाणी आजही आहेत.

रात्रंदिवस कर्तव्यावर असणारे पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या कामाचा ताणतणाव व दगदगीचे काम यातून उसंत मिळण्यासाठी पायाभूत सोयी-सुविधांसोबत स्वच्छ व आनंददायी वातावरण निर्माण करण्यासाठीचा प्रयत्न करण्यात आला आहे. सुदृढ आरोग्य, प्रसन्नतेसाठी खेळाचे मैदानही तयार केले. जलफेरभरणही केले आहे. 

काही सुविधा स्वखर्च व श्रमदानातून तर काही सोयी स्वेच्छा लोकसहभाग व सामाजिक दायित्व निधीद्वारे करण्यात आल्या आहेत. पोलिस ठाणे परिसराचे रूप ज्याप्रमाणे बदलविले; तसेच नागरिकांसाठी पोलिस व पोलिसिंगचे स्वरूपही बदलवून अधिकाधिक लोकाभिमुख पोलिसिंग करण्याची सूचनाही पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना दिल्या. 

या आहेत सुविधा 

  • पोलिस ठाणे परिसरात प्रांगणात 
  • चार ठिकाणी आसनव्यवस्था 
  • पिण्याचे शुद्ध पाणी 
  • सुसज्ज स्वच्छतागृह निर्मिती, वाहनतळाची व्यवस्था 
  • जलफेरभरण, अभ्यागत कक्ष, रंगरंगोटी, खेळाचे मैदान 

ठाण्याच्या सुंदरतेला 
दायित्वाची साथ 

श्रमदान, लोकसहभाग व सामाजिक दायित्त्व निभावले तर वाळवंटातून नंदनवन उभारतेच. हे बिडकीन पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र बनसोड व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले. त्यांनी ठाण्याच्या सुशोभीकरणासाठी स्वतःही खर्च केला. 

पोलिस ठाणे बिडकीन यांनी राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. कामानिमित्त पोलिस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना पायाभूत व अत्यावश्यक सुविधांचा लाभ होणार आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचा प्रसन्न वातावरणामुळे कामामधील उत्साह वाढून नागरिकांचे प्रश्न सुटायला मदत होणार आहे. 
-राजेंद्र बनसोडे, सहायक निरीक्षक, बिडकीन 
 

हेही वाचा- 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com