दहा अंडी दिली ; धामण अधिवासात गेली

dhaman.jpg
dhaman.jpg

औरंगाबाद : सर्पमित्र शरद दाभाडे आणि निजीन जाधव यांनी हसनपूर येथे साडेपाच फूट लांबीची धामण पकडली. बुधवारी (ता.पाच) धामण पकडल्यानंतर तिने दुसऱ्याच दिवशी गुरुवारी (ता. सहा) पांढरे शुभ्र कॅप्सूलच्या आकाराचे दहा अंडे दिले. यानंतर तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. 


सृष्टी संवर्धन संस्थेचे डॉ. किशोर पाठक यांच्याकडे सर्पमित्रांनी ही धामण ठेवली होती. डॉ. पाठक यांनी सांगितले, कोब्रा नाग वगळता अन्य साप अंडी देऊन निघून जातात. त्यातून पिले बाहेर येण्याची वाट पाहत नाहीत. सर्पमित्रांनी पकडलेली धामण तिच्या अधिवासात सोडून देण्यात आली. 

धामण हा बिनविषारी साप असून अत्यंत चपळ असून आठ ते नऊ फुटांपर्यंत वाढू शकतो. उन्हाळ्यात नर मादी यांचे मिलन होते. धामण गचपणात, भुसभुशीत जमिनीत अंडी देते आणि निघून जाते. अंडी रक्षण करणे, उबवणे हा प्रकार मादी करत नाही.

ती अंडी देऊन दुसरीकडे निघून जाते. उंदीर, बेडूक, पक्षी, खार, छोटे कीटक असे सगळे जीव धामण खाते, यामुळे एकप्रकारे ती शेतकऱ्यांचा मित्रच आहे. आता ही अंडी कृत्रिमरीत्या उबवली जाणार आहेत. अंड्यातून पिले बाहेर निघण्यासाठी दोन महिने लागतील. 

Edit-Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com