गौरी लंकेश हत्येतील संशयित ऋषीकेश देवडीकर औरंगाबादेत चालवित होता पतंजली दुकान

मनोज साखरे
Friday, 10 January 2020

ऋषीकेश देवडीकर मुळ सोलापूर येथील आहे. 2016 मध्ये तो वडील भास्करराव, आई व पत्नीसोबत औरंगाबादेतील सिडको एन-नऊ येथे राहण्यासाठी आला होता. प्रचारक म्हणून तो सोलापूरसह औरंगाबादेतही सक्रीय होता. तीन वर्षांच्या वास्तव्यात तो पंधरा दिवस औरंगाबादेत तर पंधरा दिवस इतरत्र राहत होता.

औरंगाबाद : ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात कर्नाटक एसआयटीने गुरुवारी (ता. नऊ) अटक केलेला मुख्य संशयित ऋषीकेश भास्करराव देवडीकर मुळ सोलापूरचा आहे. तो औरंगाबादेत 2016 ला राहण्यासाठी आला होता.

येथे तो पतंजलीचे दुकान चालवित होता. सुमारे तीन वर्षे त्याने वास्तव्य केले. लंकेश हत्येच्या काळातही तो औरंगाबाद-सोलापूर येथेच वास्तव्यास होता अशी माहिती त्याने केलेल्या भाडेकररानामा पत्रावरुन स्पष्ट झाली आहे. 

पत्रकार गैर लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक एसआयटीने ऋषीकेश देवडीकर याला अटक केली. त्यामुळे गौरी हत्येचे धागे उकलले जाऊ लागले आहे. तो या हत्येत प्रामुख्याने सहभागी होता असे सांगण्यात येऊ लागले आहे. त्यानेच लंकेश यांच्यावर पहिली गोळी झाडली अशी माहितीही समोर येत आहे. सोलापूरमधून काही कारणास्तव देवडीकर कुटुंबिय औरंगाबादेत राहण्यासाठी आले.

Image may contain: plant and outdoor

ऋषीकेश देवडीकर 2016 ला औरंगाबादेतील याच घरात आला होता राहायला. 

ऋशीकेष त्याची पत्नी व आई वडील 2016 मध्ये सिडकोतील एन-9 भागात यशवंत शुक्‍ला यांच्याकडे किरायने राहण्यासाठी आले. एल-44/4 या घरात ते राहत होते. सुरुवातील तो औरंगाबादेतच राहीला. मात्र त्यानंतर तो पंधरा दिवस शहरात तर पंधरा दिवस इतरत्र जात होता असे तेव्हाचे त्याचे घरमालक यशवंत शुक्‍ला यांनी सांगितले. तो माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांची शिकवणी घेत होता असे कारण दिले जात होते. 

असे होते त्याचे वर्तन 
ऋशीकेष अगदी शांत स्वभावाचा व मितभाषी होता. तो कुणाशीही जास्त संपर्क ठेवत नव्हता. कामापुरताच असायचा. तो जास्त घरातही राहत नव्हता व सिडकोतील स्थानिकांतही जास्त मिसळतही नव्हता असे काहींनी सांगितले. त्याचे काही नातेवाईक या भागात होते. हाच धागा पकडून तो औरंगाबादेत राहण्यास आला होता. 

कोण आहे ऋषीकेश देवडीकर 
ऋषीकेश देवडीकर मुळ सोलापूर येथील आहे. 2016 मध्ये तो वडील भास्करराव, आई व पत्नीसोबत औरंगाबादेतील सिडको एन-नऊ येथे राहण्यासाठी आला होता. प्रचारक म्हणून तो सोलापूरसह औरंगाबादेतही सक्रीय होता. तीन वर्षांच्या वास्तव्यात तो पंधरा दिवस औरंगाबादेत तर पंधरा दिवस इतरत्र राहत होता. त्यावेळी त्याचे लहान भाऊ द्वारकानाथ हे विश्‍वरुप हॉलजवळ राहत होते. 

तो चालवित होता पतंजली दुकान 

हेच दुकान ऋषीकेश चालवित होता. 

सिडको भागातील सोनामाता शाळेजवळ जगदीश कुलकर्णी यांची दुकान भाड्याने घेतली होती. तेथे त्याने पतंजलीचे दुकान टाकले होते. सुरुवातीला ऋषीकेश या दुकानवर जास्त बसायचा. पण नंतर तो इतर कामात व्यस्त राहत असल्याने वडील व कुटुंबातील इतर व्यक्ती या दुकानवर बसत होते. 

दुकान केले हॅंडओव्हर 
नोव्हेंबर 2017 मध्ये नोटबंदीनंतर मात्र हे दूकान त्याने साहित्यासहीत कुलकर्णी यांना दिले होते. या दुकानचा पत्ताही शॉप क्रमांक दहा, आठ-सेक्‍टर बसस्टॉप, जैन मंदीराजवळ एन-नऊ हडको असा आहे. 

ऐतिहासिक ठेवा - video : बघा यांच्याकडे आहेत 25 हजार ऐतिहासिक नाणी !

हेही वाचा - ...आणि त्याच्या डोक्यावरून गेले जेसीबीचे चाक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Gauri Lankesh Murder case