राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पडळकरांचा पुतळा जाळला, जयंत पाटलांवरील टीकेनंतर पक्षाने केला निषेध 

प्रकाश बनकर
Sunday, 24 January 2021

आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला.

औरंगाबाद : राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर आमदार गोपीचंद पडळकर यांचा शहर राष्ट्रवादीतर्फे मुकुंदवाडीत पुतळा जाळण्यात आला. यावेळी घोषणाबाजी करीत वक्तव्याचा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निषेध केला. आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. या टीकेनंतर राष्ट्रवादीतर्फे निषेध करण्यात आला.

औरंगाबादकरांची बॅनर लावून गांधीगिरी; पाणी, रस्त्यांची कामे करणाऱ्याला देणार मतदान!

त्यानंतर मुकुंदवाडी येथे राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते गोळा होत त्यांनी पडळकर यांचा पुतळा जाळला. तत्पूर्वी प्रतिकात्मक तिरडी काढून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निषेध केला. यावेळी शहराध्यक्ष विजयराव साळवे, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, माजी नगरसेवक मोतीलाल जगताप, पूर्व विधानसभा अध्यक्ष हरबक पाटील, राजाराम मोरे, विलास मगरे, इमरान पठाण, प्रशांत जगताप, राहुल कावरे, विशाल पंड आदींची उपस्थिती होती. 

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News NCP Blaze Gopichand Padalkar Statue