लॉकडाऊनमध्ये अशीही शक्कल! 

मनोज साखरे
गुरुवार, 26 मार्च 2020

दुकानदाराकडून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याची किराणा दुकानदारांची नवी शक्कल आता पोलिसांनी उघडकीस आणली आहे. किराणा दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जवाहरनगर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई २४ मार्चला रात्री आठ ते सव्वा आठच्या दरम्यान श्री गुरु जनरल किराणा स्टोअर्स येथे करण्यात आली. 

औरंगाबाद - कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी एकीकडे सरकार आणि सर्व यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र किराणा दुकान उघडे ठेवण्यास सूट दिली असतानाही तेथे मात्र तंबाखूजन्य पदार्थ विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दुकानदाराकडून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्याची किराणा दुकानदारांची नवी शक्कल आता पोलिसांनी उघडकीस आणली आहे. किराणा दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानदारांवर जवाहरनगर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई २४ मार्चला रात्री आठ ते सव्वा आठच्या दरम्यान श्री गुरु जनरल किराणा स्टोअर्स येथे करण्यात आली. 

पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार कन्हैयालाल किशनलाल पैहलाजानी, पवन कन्हैयालाल पैहलाजानी, सत्यप्रकाश छांगामल कालवानी अशी संशयित दुकानदाराची नावे आहेत. या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांनी तक्रार दिली. किराणा दुकानात तंबाखूजन्य पदार्थ विक्री तसेच होत असल्याची माहिती त्यांना मिळाली.

त्यानंतर त्यांनी संशयिताच्या पाहणी केली व तंबाखूजन्य पदार्थाचा माल जप्त केला. याप्रकरणी दुकानदाराविरुद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

लोडिंग रिक्षामधून विकत होते वडापाव 

औरंगाबाद - रिक्षातील मागील बाजूच्या शटर उघडे ठेवून वडापाव विक्री करणाऱ्या दुकानदारावर जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शेख नदीम शेख बशीर, शेख अल्ताफ शेख इसाक अशी संशयित दुकानदाराची नावे आहेत.

मोतीवालानगर जिल्हा हॉस्पिटल समोर लोडिंग रिक्षा उभी करून मागचे शटर उघडून तेथे वडापाव विक्री करीत होते. ही बाब आढळून आल्यानंतर या प्रकरणी पोलीस नाईक राजेंद्र साळुंखे यांनी त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यानुसार गुन्हे नोंद करण्यात आली. 

लॉकडाऊनमध्ये सुपारी शॉप उघडणाऱ्यावर गुन्हा 

औरंगाबाद  - मोंढा भागामध्ये सुपारी शॉप उघडणाऱ्यावर क्रांती चौक पोलिस ठाण्यांमध्ये २५ मार्चला गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार आकाश हरिषकुमार मनानी (वय ४५, रा. श्रीकृष्णा नगर, उल्कानगरी) असे दुकानदाराचे नाव आहे.

त्यांनी मोंढा भागातील त्यांची गणेश सुपारी शॉप उघडी ठेवली व तेथे तंबाखूजन्य पदार्थ विक्री करीत असताना ते आढळून आले. त्यानंतर या प्रकरणात पोलिस कॉन्स्टेबल राजेश चव्हाण यांनी तक्रार दिली. 

हेही वाचा - राज्यातील कोरोना विषाणुचा संसर्ग वाढला

बांधकाम साहित्याची चोरी 

औरंगाबाद - डॉ. लक्ष्मीकांत बाबुलाल दागडिया (रा. नाथनगर ) यांच्या बांधकाम साहित्याची चोरी झाल्याचा प्रकार २४ मार्चला रात्री घडला. या प्रकरणी जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. दागडीया यांनी तक्रारीत नमूद केले की त्यांच्या घराच्या बांधकामासाठी आणून ठेवलेले १६ स्टाइलचे बॉक्स चोरी झाले. तपास हवालदार शिंगाने करीत आहेत. 

हेही वाचा - पाऊले थांबली पण इरादा बुलंद
 

अंधारात लपून बसलेला ताब्यात 

औरंगाबाद - अंधारात चोरी, घरफोडीच्या उद्देशाने लपून बसल्याच्या संशयावरून एका तरुणाला सिडको पोलिसांनी जाधववाडीतील मोंढा परिसरातून ताब्यात घेतले. 
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार तौफिक इस्माईल शहा (वय २७, रा. फुलेनगर) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 

जिन्सीतून दुचाकी चोरी 

औरंगाबाद - मोहम्मद बद्रुद्दिन आझम मोहम्मद झिनूला (वय ५५, रा. रोशनगेट) यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून २३ मार्चला चोरांनी लंपास केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या प्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. 

हेही वाचा पुण्यात सन्नाटा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News Offence Registered Who Breaks Coronavirus Lockdown Orde Rues