औरंगाबादेतील लघू उद्योग घेणार भरारी; सीएमआयए-यूएनडीपीचा सामंजस्य करार 

प्रकाश बनकर
Sunday, 23 August 2020

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) व्यवसायात सातत्य राखण्यासाठी सल्ला तसेच स्किल मॅचमेकींग सपोर्ट देण्यासाठी सीएमआयए व युनाटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.

औरंगाबाद : येथील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (एमएसएमई) व्यवसायात सातत्य राखण्यासाठी सल्ला तसेच स्किल मॅचमेकींग सपोर्ट देण्यासाठी सीएमआयए व युनाटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम (यूएनडीपी) यांच्याबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे. यातूनच कोविड-१९ हेल्पडेस्कची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या सावटानंतर औरंगाबादेतील लघू उद्योगाला भरारी घेता येणार आहे. 

लातूर जिल्ह्यात सार्वजनिक गणेशोत्सव नाही, बाप्पाची घरी स्थापना करण्यास परवानगी

या हेल्पडेस्कच्या माध्यमातून सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना केंद्र सरकारतर्फे कोव्हीड-१९ सुरक्षा नियमावली, मार्गदर्शक तत्वे, नियामक नियम, सरकारच्या कोव्हीड-१९ विषयी उपाय योजना आणि सहाय्यता याविषयी माहिती दिली जाणार आहे. या कोव्हीड-१९ मदत कक्षाद्वारे लघु उद्योजकांना कोविडच्या प्रभावानंतर शासनाने निर्देशीत केलेल्य सुरक्षा नियमांचे पालन करत उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच उद्योगांना स्कील गॅप कसा भरून काढता येईल. याबद्दल सल्ला दिला जाईल तसेच मार्गदर्शन केले जाईल. 

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी परभणीकर सज्ज  

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योजकांनी तसेच महिला उद्योजकांनी त्यांच्या व्यवसायाशी उपलब्ध अस्लेल्या नौकरी/अप्रेंटीसशीप च्या संधी व त्यासाठी लागणारे कौशल्य, शैक्षणिक पात्रता, अनुभव, आणि अशा प्रकारचे मनुष्यबळ या माहितीसाठी चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज ॲड ॲग्रीकल्चर, रेल्वे स्टेशन एम.आय.डी.सी. येथील कार्यालशी संपर्क साधावा. या विषयी अधिक माहिती लघु उद्योजकांनी cmiamarathwadaskillshub@gmail.com, cmiasecretary@gmail.com इ-मेल वर संपर्क साधावा, असे आवाहन सीएमआयएतर्फे करण्यात आले आहे. 

परभणी जिल्ह्यात संतधार पावसाचा पिकांना फटका, शेतकरी पुन्हा संकटात  

हेल्पडेस्क एमएसएमईंना मिळणाऱ्या सुविधा 

 • वैयक्तिक आणि फोनद्वारे एमएसएमईंना सल्ला दिला जाईल व मार्गदर्शन 
 • शासकीय योजनांची माहिती दिली जाईल 
 • कामाच्या ठिकाणी आरोग्य, सुरक्षा आणि सुरक्षिततेच्या मानकांची माहिती देणे. 
 • पुर्ण क्षमतेनुसार उत्पादनास सुरूवात करणे अपेक्षित कुशल कामागरांची पुर्तता करणे यांवर मार्गदर्शन. 
 • तज्ञ व्यक्तींचा सल्ला आणि मार्गदर्शन. 
 •  
 • वित्तीय संस्था आणि सरकारी विभागां तर्फे राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळेल. 
 • बँकर्स, सरकारी अधिकारी, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ इ.यांच्याशी वेबिनारद्वारे चर्चा व मार्गदर्शन 
 • सी.एम.आय.ए.(CMIA) wa यू.एन.डी.पी.(UNDP) कोव्हीड हेल्पडेस्क-१९ तर्फे लघु उद्योजकांसाठी साठी वेबीनार/ चर्चासत्र/परीसंवाद यांचे आयोजन.
 • हेल्पडेस्क राज्य कौशल्य विकास अभियान आणि इतर संबंधित सरकारी विभाग, सहाय्यक संस्था यांच्या मदतीने उद्योजकांच्या मागणीच्या आधारावर कुशल कामगारांच्या आवश्यक ते प्रमाणे भरती करण्यास सहाय्य करेल.
 • व्यवसाय वृद्धींगत करण्यासाठी शासनाकडून तसेच इतर वित्तिय संस्थांना कडून उपलब्ध असलेल्या योजनाबद्दल मार्गदर्शन.
 • महिला उद्योजकांसाठी त्यांचा व्यवसाय पुन्हा सूरू करण्यासाठी तसेच त्यांच्या व्यावसायात विविधता आण्याच्या दृष्टीने विशेष ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन. 
 • सी.एम.आय.ए. व यू.एन.डी.पी. कोव्हीड-१९ हेल्पडेस्क ऑगस्ट-२०२० ते जानेवारी २०२१ दरम्यांन कार्यरत राहील.
 • Edited by Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad news small business CMIA-UNDP Memorandum Understanding