esakal | चोवीस तास प्रकल्प चालवा, पण कचऱ्याचे ढीग संपवा - आस्तिककुमार पांडेय
sakal

बोलून बातमी शोधा

astik kumar pandey

महापालिकेने राज्य शासनाच्या निधीतून चिकलठाणा व पडेगाव येथे सुमारे दीडशे टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले आहेत.

चोवीस तास प्रकल्प चालवा, पण कचऱ्याचे ढीग संपवा - आस्तिककुमार पांडेय

sakal_logo
By
माधव इतबारे

औरंगाबाद : कचरा प्रक्रिया प्रकल्प चोवीस तास चालवा पण कचऱ्याचे ढीग संपवा, अशा सूचना महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (ता. २१) केली.  महापालिकेने राज्य शासनाच्या निधीतून चिकलठाणा व पडेगाव येथे सुमारे दीडशे टन क्षमतेचे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केले आहेत; तसेच कांचनवाडी येथे ३० टन ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, अद्याप चिकलठाणा व पडेगाव येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर अद्याप शेकडो टन कचरा पडून आहे.

हृदयविकाराच्या झटक्याने जवानास वीरमरण, देशसेवेसाठी सेवाकाळ घेतला होता वाढवून

दरम्यान, गुरुवारी प्रशासकांनी चिकलठाणा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी प्रकल्पावर पडून असलेला कचऱ्याचा ढीग पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली. चिकलठाणा व पाडेगाव हे दोन्ही प्रकल्प २४ तास चालवा पण तेथील कचऱ्याचे ढीग शून्य करा, बंद पडलेल्या कचरा सॉर्टइंग यंत्र लवकरात लवकर सुरू करण्याची सूचना त्यांनी घनकचरा व्यवस्थापन कक्ष प्रमुख नंदकिशोर भोंबे यांना दिली. 

Edited - Ganesh Pitekar