घाटीत दाखल महिलेचा मृत्यु, स्वॅब आला पॉझिटीव्ह!,कोरोनाचा सातवा बळी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 28 April 2020

महिलेचा मृत्यू जाहीर केल्यावर डॉक्टरांनी आयसीएमआरच्या निर्देशानुसार संशयित म्हणून स्वॅब घेतला. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोना मृत्यूचा आकडा सातवर पोचला.

औरंगाबाद - घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल ७७ वर्षीय महिलेचा मृत्यु झाल्याचे जाहीर झाल्यानंतर तिचा स्वॅब घेण्यात आला.

हा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. अशी माहिती घाटीतील डॉ. सुरेश हरबडे यांनी दिली. त्यामुळे कोरोनाचा आता शहरातील हा सातवा बळी ठरला आहे.  

डॉ. हरबडे यांनी सांगितले की, किलेअर्क येथील ७७ वर्षीय संशयित महिलेला सोमवारी (ता. २७) मध्यरात्रीनंतर घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

त्यांना डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. ही महिला कोरोनाबाधीत क्षेत्रातील अर्थात किरेअर्क येथील आहे.

महाराष्ट्रातील इतर बातम्या बाचण्यासाठी - क्लिक करा

त्यामुळे या महिलेच्या घरातील सर्वांना कॉरंटाईन करण्यात आले होते. मृत्यू जाहीर केल्यावर डॉक्टरांनी आयसीएमआरच्या निर्देशानुसार संशयित म्हणून महिलेचा स्वॅब घेतला. याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरातील कोरोना मृत्यूचा आकडा सातवर पोचला.

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

 आतापर्यंत झालेले मृत्यू 

  • ५ एप्रिल सातारा परिसरातील ५८ वर्षीय बँक व्यवस्थापकाचा मृत्यू 
  • १४ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६८ वर्षीय ज्येष्ठाचा मृत्यू 
  • १८ एप्रिलला बिस्मिल्ला कॉलनीतील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २१ एप्रिलला भावसिंगपुरा येथील ७६ वर्षीय महिलेचा मृत्यू 
  • २२ एप्रिलला आरेफ कॉलनीतील ६० वर्षीय पुरुषाचा मृत्यू 
  • २७ एप्रिलला किलेअर्क भागातील ६० वर्षीय महिलेचा मृत्यु
     

महिलेला सोमवारी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्या मृत होत्या. त्यांचा स्वॅब अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा कोरोनामुळे झालेला मृत्यु आहे, असे घाटी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad News The Woman's Death, Corona Reported Positive