क्लिक करा, भूतकाळात जा : शंभर वर्षांपूर्वी असे होते औरंगाबाद...

संकेत कुलकर्णी
Sunday, 29 December 2019

खाम नदीच्या तीरावर वसलेल्या खडकी गावाचे पूर्वी मलिक अंबरने शहरात रुपांतर केले. त्याच्या मुलाच्या नावावरून या गावाचे नाव फतेहपूर असे पडले होते. मुघल बादशहा औरंगजेबाच्या दीर्घ वास्तव्यानंतर ते औरंगाबाद ठेवण्यात आले. याच शहराचे आज उरलेले जुने रूप... 

ऐतिहासिक, सांस्कृतिक, वास्तु-शिल्पकलेचा वारसा लाभलेल्या औरंगाबाद शहरात आता अनेक वास्तू नामशेष होत चालल्या आहेत.

अजिंठा-वेरुळची लेणी, दौलताबाद किल्ला आणि बिबी का मकबरा हे औरंगाबादचे भूषणच. पण मलिक अंबरने बांधलेला नवखंडा महल, पहाडसिंग राजाचा सोनेरी महल, पाण्याच्या नियोजनासाठी बांधलेल्या नहरी, मुघलकालीन मशिदी, निजामकालीन देवड्या अशा अनेक वास्तू शेवटच्या घटका मोजत आहेत.

खाम नदीच्या तीरावर वसलेल्या औरंगाबाद शहराचे पूर्वीचे रूप प्रसिद्ध संग्राहक खालेद अहेमद यांनी या जुन्या छायाचित्रांच्या माध्यमातून जपून ठेवले आहे. त्यांच्याच सौजन्याने esakal.com च्या वाचकांसाठी ही खास छायाचित्रे...

Image may contain: outdoor
दिल्ली दरवाजा

दिल्ली दरवाजा

शहाजहान बादशहाच्या कारकिर्दीत औरंगजेबाने आपल्या दख्खनच्या सुभेदारीच्या काळात इ.स. 1657 च्या सुमारास हा दरवाजा बांधला. दिल्लीचे तख्त काबीज करण्यासाठी औरंगजेबाने आपल्याच पित्याविरुद्ध बंड पुकारून 1658 मध्ये औरंगाबादहून याच दरवाजातून दिल्लीकडे कूच केले. तेव्हापासून दिल्लीकडे जाणारा हा मार्ग 'दिल्ली दरवाजा' नावाने सुपरिचित आहे.

Image may contain: one or more people, tree and outdoor
जुनाबाजार येथील जूनाखानची सराई

1666 मध्ये औरंगजेबाच्या 50 व्या वाढदिवशी आग्रा येथे त्याला भेटण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि युवराज संभाजीराजे याच दरवाजातून औरंगाबाद मुक्कामाहून दिल्लीकडे रवाना झाले होते. 66 फूट लांब आणि साडेपंचावन्न फूट रुंदीचा हा दरवाजा 41 फूट उंच आहे. दरवाजाच्या दोन्ही बाजूंना भक्कम बुरूज आणि त्यावर मनोरे आहेत. महाराष्ट्र शासनाने हा दरवाजा "राज्य संरक्षित स्मारक' म्हणून जाहीर केला आहे.

Image may contain: sky and outdoor
नहर-ए-अंबरीचा बंबा

नहर-ए-अंबरी

खाम नदी, राजतडाग आणि जुन्या बारवा, विहिरी...  केवळ एवढ्या पाणीसाठ्याच्या भरवशावर मोठे शहर वसवणे शक्‍यच नव्हते. जुन्या खडकी शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात याहून वेगळे जलस्रोत निर्माण केल्याशिवाय नागरी वस्ती वाढणार नाही, हे निजामाचा हुशार वजीर मलिक अंबर याने ओळखले.

Image may contain: outdoor
नहरीचा अंतर्भाग

दूरदूरचे टिकाऊ स्रोत शोधून तेथून पाणी आणून भरवस्तीत खेळवले तरच शहराची गरज भागणार होती. 16 व्या शतकात मलिक अंबरने नहरींची कल्पना प्रत्यक्षात आणली.

'नहर-ए-अंबरी' ही शहराची खास ओळख आहे. औरसचौरस पसरलेल्या औरंगाबादेत वीस ठिकाणांवर या नहरींचे जाळे पसरले होते. नहर-ए-अंबरीचे गोमुखापासूनचे अवशेष शहरात पाहायला मिळतात.

Image may contain: table and outdoor
मन्सूर यार जंग यांची हवेली

गुलशन महल, टाऊन हॉल, शहागंज, लोटाकारंजा, किलेअर्क, जुना बाजार अशा ठिकाणी हे पाणी खेळवले होते. त्याशिवाय थत्ते नहर, पाणचक्की नहर, पळशी नहर अशा स्वतंत्र नहरीही होत्या. यातील पाणचक्की आणि थत्ते नहर आजही सुस्थितीत आहेत.

Image may contain: house and outdoor
वजीर खां तंबाकूवाला यांचा बंगला

हे पाणी नहरींतून म्हणजे मोठ्या दगडी किंवा खापरी नळांमधून उगमापासून आणले जाई. सायफन तंत्राचा वापर करून पाण्याला प्रेशर देण्यासाठी ठराविक अंतरावर उंच उच्छ्वास बांधले गेले. यातून लहान-मोठ्या पाईपमधून पाणी हौदांपर्यंत आणले गेले. छायाचित्रात दिसणारा उच्छ्वास "बंबा' म्हणून ओळखला जातो. असे अनेक बंब शहरात आहेत.

Image may contain: sky and outdoor
औरंगपुऱ्यातील जुने संत एकनाथ मंदिर

लेबर कॉलनी चौकात, बारूदगर नाल्यावर आणि उस्मानपुरा भागातील प्रतापनगर परिसरातील बंब तर उंचच उंच बांधले आहेत. शहराच्या विस्तारीकरण आणि विकासकामांत त्यातील अनेक उद्‌ध्वस्त झालले असले तरी बेगमपुऱ्यातील थत्ते नहराचे दहाही "बंबा' अजून सुस्थितीत आहेत.

Image may contain: outdoor
सोनेरी महाल

सोनेरी महाल

औरंगाबाद लेणीच्या परिसरात गोगाबाबा टेकडीच्या पायथ्याशी असलेला हा महाल चोहोबाजूंनी चिरेबंदी तट आणि हाथीखाना असलेला! हा महाल बांधला तो बुंदेलखंडातील ओरछा संस्थानचा राजा पहाडसिंग याने. मोगल बादशहा औरंगजेबाच्या सैन्यात आलेल्या पहाडसिंगाची या भागात छावणी पडली. उत्तर-मध्य भारतातील प्रामुख्याने बुंदेलखंडातून आलेले लोक इथेच स्थायिक झाले.

Image may contain: sky, outdoor and nature
बेगमपुरा येथील तटबंदी

त्यांच्या वस्तीच्या एका बाजूला गोगानाथ टेकडीच्या पायथ्याशी एका उंच चबुतऱ्यावर असलेल्या या महालात सोन्याचा मुलामा दिलेली सुंदर नक्षी चितारलेली होती. त्यावरून त्याला "सोनेरी महल' हे नाव पडले. 

हेही पहा - इब्राहिमखान गारद्याचे मूळ छायाचित्र औरंगाबादेत. पण कुठे?

सध्या येथे राज्य पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालये संचालनालयाचे विभागीय कार्यालय आणि पुराणवस्तू संग्रहालय आहे. सोनेरी महलसमोर दोन जुन्या बारवा आणि लाला हरदौलचा चबुतराही आहे.

Image may contain: sky and outdoor
मोती मस्जिद (शाही मशीद)

किले अर्क आणि मोती मस्जिद (शाही मशीद)

दख्खनचा सुभेदार म्हणून मोगल शहजादा औरंगजेब या शहरात आला. 1658 मध्ये राजकारणातील चढ-उतारांत दिल्लीची गादी बळकावण्यासाठी त्याला पुन्हा उत्तरेत जावे लागले; पण 1682 मध्ये मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत आलेला बादशहा औरंगजेब पुढे 1707 पर्यंत म्हणजे सुमारे 26 वर्षे या भागात होता. या दोन्ही काळांत त्याने औरंगाबाद शहराला तटबंदी बांधून घेतली.

Image may contain: sky and outdoor
महापालिकेने जेसीबी लावून पाडलेला खूनी दरवाजा

बहुतांश काळ अहमदनगर येथे घालवलेल्या औरंगजेबासाठी औरंगाबादेत "किला-ए अर्क' बांधण्यात आला. तेथे मर्दाना महल, जनाना महल, रंगबारी आणि इतर इमारतींबरोबरच शाही मस्जिद आणि जनाना मस्जिदही बांधली गेली. याच शाही मशिदीत बादशहा औरंगजेब नमाज पढत असे. तिला "मोती मस्जिद' म्हणूनही ओळखले जाते. ही मशीद आता शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयाच्या आवारात दिमाखात उभी आहे.

Image result for shahaganj old tower

शहागंज चमनवरील घड्याळ

शहागंजची मंडी, चमनवरील टांगेवाले आणि जुने बसस्थानक ही जुन्या औरंगाबादची खास ओळख; पण 20 व्या शतकाच्या तिसऱ्या दशकात इथे उभ्या राहिलेल्या एका इमारतीने शहागंजची ओळख चिरस्थायी बनवली. ती इमारत म्हणजे घड्याळाचे टॉवर.

Image may contain: tree, sky and outdoor
मलिक अंबरने बांधलेली जामा मशीद

हैदराबादचा अखेरचा निजाम मीर उस्मान अली खान गादीवर येऊन 1930 मध्ये 24 वर्षे पूर्ण झाली. त्याची आठवण म्हणून निजामाने शहागंजात घड्याळाचा हा टॉवर उभारला. त्यावरील सायरन दररोज पहाटे सूर्योदयाला वाजत असे. रमजानच्या इफ्तार आणि सहरच्या वेळीही हा सायरन वाजत असे.

Image may contain: sky, cloud and outdoor
जुनाबाजार येथील नामशेष झालेली बुऱ्हाणी नॅशनल स्कूलची हवेलीवजा इमारत

शहागंज ही त्या काळी प्रतिष्ठितांची वस्ती होती. मलिक अंबरने या ठिकाणी अहमदनगरच्या निजामासाठी मोठी हवेली उभारली होती. तेव्हापासून अनेक प्रतिष्ठित मंडळी इथे वास्तव्य करून राहिली. यातच पुढे मोगल शहजादे, सरदार राहिले. पुढे हा महाल महाराजा चंदूलाल यांचे वारस राजा किशनप्रसाद यांच्या ताब्यात परंपरेने आला. हे किशनप्रसाद निजामाचे दिवाण. त्यामुळे या महालाला लोक दिवाणदेवडी म्हणू लागले.

Image may contain: outdoor
आता नामशेष झालेले अदालत रोडवरील न्यायमंदिर (जुने न्यायालय)

राजाबाजारचा संस्थान गणपती हे तर औरंगाबादचे ग्रामदैवत. त्यापुढे जाधवमंडी (जादूमंडी?) ऐवजखानाने बांधलेली भव्य मशीद, सराफा, गांधी पुतळा, गांधी भवन, प्रसिद्ध बालाजी धर्मशाळा, अशा जुन्या इमारती आणि वास्तू या भागाचे ऐतिहासिक वैभवच आहेत. शहागंजचे आजचे स्वरूप बदलले असले, तरी तिथे या खाणाखुणा स्पष्ट बघायला मिळतात. 

वाचा - पेशव्यांचा हा मुलगा का झाला मुसलमान?

Image may contain: sky, tree and outdoor
मिर्झाराजे जयसिंग यांची छत्री


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Old Photos by Khaled Ahmed