उड्डाणपुलाखाली पार्क, प्लेईंग झोन अन सायकल ट्रॅक 

औरंगाबाद : सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली बनवण्यात आलेले जायंटस क्‍लाय पार्क.
औरंगाबाद : सिडकोतील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली बनवण्यात आलेले जायंटस क्‍लाय पार्क.

औरंगाबाद - जायंट्‌स ग्रुप ऑफ प्राईड औरंगाबादच्या पुढाकाराने शहराची स्वच्छता, पर्यावरण व सौंदर्यीकरणाच्या उद्देशाने एपीआय स्क्वेअरजवळ स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाखाली जायंट्‌स फ्लाय पार्क तयार करण्यात आले आहे. याचे लोकार्पण शनिवारी (ता. 25 ) करण्यात येणार आहे असल्याचे जायंट्‌स ग्रुप ऑफ प्राईड औरंगाबादचे अध्यक्ष संजय जैस्वाल यांनी सांगीतले. 

श्री. जैस्वाल म्हणाले, औरंगाबाद ही पर्यटनाची राजधानी असून येथे अजिंठा, वेरूळ यांसारख्या जगप्रसिद्ध लेण्या आहेत. या लेण्या पाहण्यासाठी देश-परदेशातून पाहूणे येतात. पाहुण्यांचे स्वागत स्वच्छतेने झाल्यास औरंगाबाद शहराची प्रतिमा जगात उंचावेल. त्याचबरोबर सौंदर्यीकरण आणि पर्यावरणाच्या दृष्टीने विचार करून हे फ्लाय पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. या माध्यमातून पार्कमध्ये येणाऱ्या सर्वांना स्वच्छ ऑक्‍सिजन मिळण्यासाठी वेगवेगळ्या जातींची झाडे लावण्यात आली आहे. 

उड्डाणपूल तयार केल्यापासून ते आजवर जेथे कचरा पडत होता, तेथे जायंट्‌सने खऱ्या अर्थाने नंदनवन फुलवले. एकूण 17 हजार चौरस फूट जागेमध्ये साडेसहा फूट रूंद व सातशे फूट लांबीचा वॉकिंग ट्रॅकसह सहा फूट रूंदीसह तीनशे फूट सायकलसाठी स्वतंत्र ट्रॅक निर्माण करण्यात आला आहे. प्रत्येकी सोळाशे चौरस फूट जागेमध्ये दोन पार्क तयार करण्यात आले असून याठिकाणी 128 लोकांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी जवळपास एकही गार्डन नाही. हे लक्षात घेऊन सोळाशे चौरस फूट जागेमध्ये प्लेईंग पार्कमध्ये सी-सॉ, घसरगुंडी आणि झोका बसविण्यात आला आहे.

पाम, बांबूसह झाडे 

वाहनांतून निघणाऱ्या धुरांपासून तेथे येणाऱ्यांचे संरक्षण करण्याकरिता पाम व बांबू यांसारखे दोनशेहून अधिक झाडे लावण्यात आली आहे. ज्यामुळे तेथे बसणाऱ्यांना प्रदूषणांपासून हानी न होता दर्जेदार ऑक्‍सिजन मिळेल, याचीही काळजी घेण्यात आली आहे. या परिसराच्या संरक्षणासाठी सहा फूट उंचीचे फेन्सिंग करण्यात आले आहे.

उड्डाणपुलाच्या या खालच्या भागात असणाऱ्या पिलरवर औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळांची चित्रे व माहिती रेखाटण्यात आली आहे. हा पहिला टप्पा असून दुसऱ्या टप्प्यात याला जोडूनच 25 हजार चौरस फूट जागा विकसित करण्याचे नियोजन ग्रुपने केले आहे. यामध्ये क्रिकेट टर्फ, स्केटिंग ट्रॅक, म्युरल गार्डन, थ्री डी गार्डन आणि लॅंडस्केप गार्डन असेल. दुसऱ्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या अतिरिक्त खर्चासाठी सीएसआर फंड किंवा दात्यांची आवश्‍यकता असल्याचे श्री. जैस्वाल यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com