
वेळी इंडियन ऑइलचे कार्पोरेशनचे उपमहाप्रबंधक सुहास तूमाने यांची प्रमुख उपस्थिती होती
बिडकीन (औरंगाबाद) : गुरुवारी बिडकीन पोलिस पेट्रोल पंपाचा भूमिपूजनचा कार्यक्रम पार पडला. ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. यावेळी इंडियन ऑइलचे कार्पोरेशनचे उपमहाप्रबंधक सुहास तूमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. बिडकीन येथील पोलीस कॉलनी वसाहत डी एम आय सी च्या रोडवर तीन एकर क्षेत्रामध्ये आहे.
या जागेचा पोलीस वसाहती शिवाय पोलिसांच्या फायद्यासाठी वापर होऊ शकतो हे लक्षात घेऊन ग्रामीण पोलीस अधीक्षक श्रीमती मोक्षदा पाटील यांनी याठिकाणी पेट्रोल पंप सुरू करण्याचे ठरविले. या पेट्रोल पंपाचा नफा हा पोलिस वेल्फेअर निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. त्यादृष्टीने या ठिकाणी पेट्रोल पंपाचे काम सुरू करण्यात आले असून आज त्याचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला.
धक्कादायक! पुरावा नष्ट करण्यासाठी उकिरड्यावर फेकून दिलं अर्भक; पोलिसांचा...
यावेळी पैठणचे पोलीस उपअधीक्षक गोरख भामरे शिवसेना तालुका उपतालुकाप्रमुख मनोज पेरे, मंडळ निरीक्षक ठेंगे, तलाठी बोंद्रे, ग्रामसेवक नारायण पाडळे, एल अँड टीचे अधिकारी आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोरख भामरे यांनी केले त्यावेळी त्यांनी पोलिस पेट्रोल पंपसाठी मदत करणारे मंडळ अधिकारी, तलाठी, एल अँड टी कंपनीचे अधिकारी यांचे आभार मानले.
नगरपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्टवादीची रणनीती तर भाजपचा 'एकला चलो...
याप्रसंगी बोलताना पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील म्हणाल्या की, 'पेट्रोल पंपाच्या माध्यमातून जो पैसा येणार आहे तो पोलिस वेल्फेअर निधीमध्ये वर्ग केला जाणार आहे. पोलिसांच्या हितासाठी त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी खर्च करण्यात येईल. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील,प्रशांत मुंढे, पोलीस नाईक भगवान जाधव, अनंत घोळवे, गोविंद राऊत, अभिजित सोनवणे, विष्णू गायकवाड, आदी पोलिस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
पोलिस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या कुटुंबाच्या कल्याणाकरीता व अडचणीच्या वेळी पेट्रोलपंपाच्या नफ्याचा उपयोग करता येणार आहे- मोक्षदा पाटील
(पोलिस अधिक्षक ग्रामीण औरंगाबाद)
(edited by- pramod sarawale)