औरंगाबाद 'स्मार्ट बस' पुन्हा धावणार; चालक भरतीचा मार्ग ही मोकळा  

माधव इतबारे
Thursday, 1 October 2020

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद मध्ये सुरु असलेली स्मार्ट सिटी बस बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मार्च मध्ये घेतला , या निर्णयानुसार सिटी बसची सेवा बंदच आहे. करोना प्रादुर्भावानंतर आता हळूहळू परिस्थिती सामान्य होत चालली आहे. त्यामुळे शासनाने १ ऑक्टोबरपासून नवीन अनलॉक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आंतरराज्यीय रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे.

औरंगाबाद : एसटी महामंडळाने राज्यभर सेवा सुरू केल्‍यामुळे शहर बस सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसात शहर बस सेवा टप्प्या-टप्प्याने सुरु केली जाईल, असे महापालिकेने प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी गुरुवारी (ता. एक) सांगितले. बस सेवेसाठी चालक घेण्याचा मार्गही मोकळा झाल्याचे श्री. पांडेय यांनी सांगितले. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे औरंगाबाद मध्ये सुरु असलेली स्मार्ट सिटी बस बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने मार्च मध्ये घेतला , या निर्णयानुसार सिटी बसची सेवा बंदच आहे. करोना प्रादुर्भावानंतर आता हळूहळू परिस्थिती सामान्य होत चालली आहे. त्यामुळे शासनाने १ ऑक्टोबरपासून नवीन अनलॉक धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार आंतरराज्यीय रेल्वे प्रवासाला मुभा देण्यात आली आहे. एसटी महामंडळाची बससेवा यापूर्वीच सुरु झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात सिटीबसची सेवा सुरु केली जाणार आहे का असे पत्रकारांनी महापालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना विचारले असता ते म्हणाले, ऑक्टोबर महिन्यात टप्प्या टप्प्याने सिटी बस सेवा सुरु केली जाईल. सिटी बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येवर देखील निर्बंध घातले जातील, जेणे करुन करोनाचा संसर्ग वाढणार नाही. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

स्मार्ट बस बद्दल मंगळवारी मुंबईत पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थिती बैठक झाली, त्याची माहिती देखील आस्तिक कुमार पाण्डेय यांनी दिली. सिटी बसच्या डेपोसाठी एसटी महामंडळाची मुकुंदवाडी आणि रेल्वेस्टेशन येथील जागा औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला देणे, ठराविक वेतनावर कंत्राटी चालकांची नियुक्ती करणे आणि एसटी महामंडळातर्फे औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानक आणि सिडको बसस्ठानकाचे बांधकाम केले जाणार आहे, या बांधकामासाठी विकास शुल्कात सुट देणे हे तीन विषय बैठकीत चर्चीले गेले.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बसडेपोच्या जागेसाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय परिवहन मंत्री घेतील असे या बैठकीत ठरले. एसटी महामंडळाने चालक या पदावर पंधरा हजार रुपये ठराविक वेतनावर काम करण्यासाठी मुलाखती घेवून प्रतीक्षा यादी तयार केली आहे. या यादीतील उमेदवारांना स्मार्ट बससाठी नियुक्त करण्याचे ठरवण्यात आले. विकास शुल्कात सुट देण्याबद्दल मात्र कोणताही निर्णय झाला नाही असे पाण्डेय यांनी स्पष्ट केले. 

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad smart city bus news