(VIDEO) : अभिमानास्पद...! आठ वर्षांपासून देताहेत तीनशे योग शिक्षक मोफत प्रशिक्षण 

yogasan.jpg
yogasan.jpg

औरंगाबाद : स्वत: पैसे भरून शिक्षण घेतल्यानंतर त्याचा सर्वांना फायदा झाला पाहिजे या भावनेतुन जनकल्याण संमितीचे सवा तीनशे योगशिक्षक शहराच्या वेगवेगळ्या भागात योगाचे मोफत प्रशिक्षण देत आहेत.

पुरातनकाळी ऋषिमुनी एका ठिकाणी बसून ध्यानधारणा करत यासाठी शरीराला चांगले वळण मिळावे यासाठी योगशास्त्र आहे. सध्याच्या जीवनशैलीतही शारिरीक परिश्रम नाहीत यासाठी योगसाधना काळाची गरज बनली आहे, यासाठी हे योगशिक्षक मोफत योग प्रशिक्षण देत आहेत. 

अर्थिक सुबत्ता आल्याने मानवी जीवन सुखवस्तू बनले. शारीरीक हलचाली कमी झाल्या आहेत. वरून माणुस खूप सुदृढ दिसत असला तरी शरीर आणि मनाला निरोगी ठेवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. सध्या कोरोनाचे संकट आले आहे, मात्र याला ज्यांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे अशीच माणसे खंबीरपणे तोंड देत आहेत.

शरीर अशा संसर्गजन्य साथींना सक्षमपणे तोंड देऊ शकेल असे तयार करण्याची क्षमता योग आणी प्राणायामात आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे भाग्यनगर येथे जनकल्याण समितीच्यावतीने योगशास्त्राचा एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम शिकवला जातो. या ठिकाणी योगशिक्षण घेऊन बाहेर पडलेले सुमारे ३२५ योगशिक्षक शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या आठ वर्षांपासून मोफत योग शिक्षण देण्याचे काम करत आहेत. 

जनकल्याण समिती संचलित मुक्त विद्यापीठाच्या योग अभ्यास केंद्राचे प्रमुख बाळकृष्ण खानवेलकर म्हणाले, मनस्वास्थ्य आणि शारीरीक स्वास्‍थ्यासाठी भारतीय परंपरेत आपल्या पुर्वजांनी अष्टांग योग शोधून काढले आहेत. जीवनात यातुन अमुलाग्र बदल घडून येतात. निरोगी जीवन, उत्तम स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल तर योग अतिशय महत्वाचे आहेत. यासाठी हे योगअभ्यास केंद्र चालवण्यात येत आहे.

या ठिकाणी योग, प्राणायम, शुद्धीक्रिया, बंध, आसने, मुद्रा असे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाते. भारतीय आहारशास्त्र, योगशास्त्र, शरीरशास्त्र शिकवले जाते. नऊ साधकांपासून या केंद्राची सुरूवात झाली आज ११६ साधक प्रशिक्षण घेत आहेत. गेल्या आठ वर्षात ३२५ योगशिक्षक इथून तयार झालेले आहेत आणि ते वेगवेगळ्या भागात मोफत प्रशिक्षण देत आहेत. आपण जे करतो ते सर्वांना द्यावे आणि त्याचा समाजाला फायदा व्हावा ही त्यामागची भुमिका आहे.

योग, ध्यानधारणेमुळे मन आणि शरीर जोडले जाते. चित्त स्थिर राहते, कोणतेही धक्के सहन करण्याची अंगी पात्रता येते.विविध संसर्गजन्य आजारांना, व्याधींना योग - प्राणायामामुळे दूर ठेवता येते. कोणत्याही डॉक्टरकडे जाण्याची वेळ येऊ नये असे वाटत असेल, मन आणि शरीर निरोगी राहावे असे वाटत असेल तर योगाभ्यास खूप महत्वाचा असल्याचे मत श्री. खानवेलकर यांनी व्यक्त केले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com