लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघे निघाले पॉझिटिव्ह, लाळेच्या नमुन्यांची होणार घाटीत तपासणी

Aurangabad News
Aurangabad News

औरंगाबाद : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सध्या देशपातळीवर लसीकरणाची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर यांना लस देण्यात आली. आता ज्येष्ठ नागरिकांना लस दिली जात आहे. लस घेतल्याने कोरोनापासून बचाव होणार असल्याने लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर दुसरीकडे लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही दोघेजण पॉझिटिव्ह आढळून आल्याचे समोर आले आहे. या दोघांच्याही लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार असल्याचे महापालिकेतर्फे सांगण्यात आले.


शहरात कोरोनाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. दररोज आढळून येणाऱ्या रुग्णांची संख्या तीनशे पार झाली आहे. वाढता संसर्ग पाहता आरोग्य विभागाने लसीकरणाची मोहीम तीव्र केली आहे. लसीकरणाव्दारे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी पहिल्या टप्प्यात लस घेणारे दोन डॉक्टर काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यावेळी दोन्ही डोस घेतल्यानंतर १४ दिवसानंतर शरिरात कोरोनाला रोखण्यासाठी अ‍ॅटीबॉडीज् तयार होते, असे सांगण्यात आले. मात्र आता लसीचे दोन्ही डोस घेतलेले दोन जण पॉझिटिव्ह आल्याचे समोर आले आहे. या दोघांचे डोस पूर्ण होऊन चार ते पाच दिवस झाले असून, त्रास होत असल्यामुळे त्यांनी कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेतला. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला, त्यामुळे आरोग्य यंत्रणेला धक्का बसला आहे.


कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर साधारणपणे १५ दिवसांनंतर अ‍ॅटीबॉडीज् तयार होतात. दरम्यान दोन्ही डोस घेतल्यानंतरही पॉझिटिव्ह आढळून आलेल्या दोघांच्या लाळेचे नमुने तपासणीसाठी घाटी रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. या दोघांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात दोघांमध्ये सौम्य लक्षणे आढळून आली. लसीचे दोन्ही डोस घेतले तरी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे नियम पाळावेच लागतील.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका.
 

Edited - Ganesh Pitekar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com