जागतिक वारसास्थळ असलेली 'अजिंठा लेणी' पाडतेय जगाला भूरळ

ajintha caves
ajintha caves

औरंगाबाद: औरंगाबाद हा मराठवाड्यातील सर्वात मोठा जिल्हा आणि प्रशासकीय दृष्टीनेही सर्वात महत्ताचा जिल्हा आहे. पर्यटनाच्या बाबतीतही औरंगाबाद जिल्ह्यात अनेक उत्तम स्थळे आहेत. त्यामध्ये शहरारोबरच संपूर्ण जिल्ह्यात विविध प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत.

इतिहासामध्ये औरंगाबादचा परिसर खूप प्रसिध्द आणि महत्त्वाचा भाग होता. अनेक हिंदू-मुस्लीम राजांची सत्ता या भागाने पाहिली आहे. जगप्रसिध्द अजिंठा लेण्या औरंगाबादच्या पर्यटनातील एक प्रसिध्द ठिकाण आहे. हे ठिकाण औरंगाबादमधील सोयगाव तालुक्यात स्थित आहे. अजिंठा ठिकाणाचा समावेश जागतिक वारसास्थळांमध्ये होतो. 

अजिंठा लेण्या या औरंगाबाद शहरापासून जवळपास 100 किलोमिटरवर आहेत. या लेण्या वाघूर नदीच्या परिसराशेजारी वसल्या आहेत. इ.स. पूर्व 2 रे ते इ.स. 4 थे शतक अशा प्रदीर्घ कालखंडात तयार केलेल्या 29 बौद्ध लेण्या इथं आहेत. विशेष म्हणजे या लेण्या वाघूर नदीपात्रापासून 15-30 मीटर उंचीवरील विस्तीर्ण डोंगररांगावर कोरल्या आहेत. बौध्द धर्माचा वारसा जतन करणाऱ्या या लेण्या वर्षभर पर्यटकांनी गजबजलेल्या असतात. 

अजिंठा विशेष-
भारतातील पहिला जागतिक वारसा स्थळाचा मान या लेण्यांना मिळाला होता. 1983 साली अजिंठा लेण्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थान म्हणून घोषित केलं होतं. तसेच भारतातील सात आश्चर्यांमध्येही अजिंठा लेण्यांचा समावेश आहे. या लेण्यांमधील  एका लेणीचे चित्र चलनातील 20 रुपयांच्या नोटेवरही पाहायला मिळते.  

अजिंठा लेण्या ह्या जागतिक शिल्पकलेमधील सर्वोत्तम अविष्कार म्हणून पाहिल्या जातात. या ठिकाणी एकूण 29 लेण्या असून यामध्ये गौतम बुध्दांच्या विविध भावमुद्रा आणि चित्रशिल्प रुपातील बौध्द तत्त्वज्ञान दिसते.

अजिंठा लेण्यांचा शोध-
या लेण्यांचा शोध 19 व्या शतकात मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ याने लावला. तो जंगलात वाघांच्या शिकारीसाठी गेला असता स्मिथला या लेण्या दिसल्या होत्या. आजही अजिंठा लेण्यामधील लेणी क्रमांक दहावरील एका खांबावर स्मिथने त्याचे नाव आणि तारीख कोरलेली अंधुकपणे दिसून येते. पुरातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार अजिंठा लेण्या दोन वेगवेगळ्या कालखंडांत निर्माण केली गेल्या आहेत. 

लेण्यांमधील चित्रकला-
अजिंठ्यातील चित्रे ही प्रामुख्याने बुद्धांच्या जीवनावर आधारित जातक कथांचे चित्रण आहे. बुद्धांच्या जन्मापूर्वीपासूनच्या कथा यामध्ये समाविष्ट आहेत. या कथांमधून सांस्कृतिक दुवे तसेच नीतिमूल्ये दिसून येतात. बुद्धांचे आयुष्य, त्यांचे विविध अवतार, त्यांचे पुढील जन्म असे सर्व वर्णन या जातक कथांमध्ये दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com