esakal | पर्यटनाच्या गाडीला 'ब्रेक'च, औरंगाबादेत चारशे कोटींचे नुकसान !     
sakal

बोलून बातमी शोधा

Cave.jpg

लॉकडाऊनमुळे पर्यटनाशी निगडीत असलेले व्यवसाय ठप्प, सहा महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात तब्बल चारशे कोटींचे नुकसान झाले आहे. 

पर्यटनाच्या गाडीला 'ब्रेक'च, औरंगाबादेत चारशे कोटींचे नुकसान !     

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : कोरोनामुळे सर्व जग ठप्प झाले आहे. याच काळात गेल्या सहा महिन्यापासून राज्यातील सर्व पर्यटन स्थळेही बंद ठेवण्यात आली आहेत. सध्या अनलॉक सुरु झाले असून हळूहळू सर्व क्षेत्र सुरु करण्यात येत आहेत. मात्र, अद्यापही पर्यटन स्थळे सुरु करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. पर्यटनावर अवलंबून असलेला जिल्ह्यातील साडे तीनशे ते चारशे कोटींचे नुकसान झाल्याचा दावा पर्यटन विकास मंडळाचे जसवंत सिंग यांनी केला. त्यामुळे पर्यटनाची ही गाडी कधी वेग घेणार याची प्रतीक्षा कायम आहे.  

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेच्या पर्यटन वारीसाठी ऑक्टोबर ते मार्च दरम्यान दरवषीं विदेशातून ७० हजार तर देशभरातून जवळपास १० ते १५ लाख पर्यटक येतात. यासह वर्षभर पर्यटकांचा ओघ सुरुच राहतो. मात्र यंदा लॉकडाऊनमुळे संपुर्ण सिजन वाया गेला. यात प्रामुख्याने एअरलाईन, हॉटेल उद्योग, ट्रॅव्हर्स-टुर ऑपरेटर, ट्रॉन्स्पोर्ट, गाईड, शॉप किपर्स, छोटे रिर्साट, छोटे दुकानदार, हॉकर्स यांचे ४०० कोटीहुन अधिकचे नुकसान झाले आहेत. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सर्वाधिक पर्यटक हे अजिंठा लेणी, वेरुळ लेणी, घृष्णेश्‍वर मंदीर (बारा ज्योतिलिंग पैकी एक), बीबी-का-मकबरा, पानचक्की, पितळखोरा लेणी, देवगिरी किल्ला, औरंगाबाद लेणी, संत एकनाथ मंदिर, पैठण, जायकवाडी जलाशय, अंतुर किल्ला, वसाईचा किल्ला यासह आणखी धर्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी येत असतात. गेल्या सहा महिन्यांपासून ही पर्यटनस्थळे पुर्णपणे बंद आहेत. 
केंद्र सरकारतर्फे नियम घालून देशातील प्रमुख पर्यटनस्थळे सुरु करण्यात येत आहे. मात्र राज्यात अद्यापही कुठलेच हालचाली झाल्या नाहीत. यामुळे यावर अवलंबुन असलेल्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे केंद्राप्रमाणे राज्यातही नियम लावत पर्यटनस्थळे सुरु करण्याचा मागणी होत आहे. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

पालकमंत्र्याना साकडे! 
केंद्र सरकारतर्फे ताजमहल सह इतर ऐतिहासिक पर्यटन स्थळे खूली करून पर्यटन क्षेत्राला चालना देत आहे. त्याच पार्श्र्वभुमीवर ऐतिहासिक औरंगाबाद जिल्ह्यातील व परिसरातील पर्यटन क्षेत्र सुरु करण्यात यावी, अशी मागणी पर्यटन विकास मंडळ व औरंगाबाद फस्टच्या माध्यमातून पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहेत. पर्यटन विकास मंडळाचे जसवंत सिंग राजपूत व औरंगाबाद फस्टचे अध्यक्ष मानसिंग पवार, अरबाज अन्सारी, श्रीकांत जोगदंड यांनी पालकमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेत ही मागणी केली.गेल्या सहा महिन्यापासून पर्यटन उद्योग ठप्प आहे. यामुळे याक्षेत्रात काम करणाऱ्या असंख्य लोकांना उपासमारीची वेळ आली आहे. शहरातील पर्यटन खुले करून दररोज पाच हजार पर्यटकांना परवानगी द्यावीत. अशी मागणीही या निवेदनातून करण्यात आली आहे. 

(संपादन-प्रताप अवचार)