कास पठाराच्या धर्तीवर औरंगाबादच्या पर्यटनस्थळांना गती; 'म्हैसमाळ'वर रानफुलांचे ताटवे!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 14 October 2020


प्रसिद्ध पर्यटनस्थळ कास पठाराच्या धर्तीवर सजणार विविध पर्यटनस्थळे 

खुलताबाद (औरंगाबाद) ः मराठवाड्याचे महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेल्या म्हैसमाळच्या पठारावर कास पठाराच्या धर्तीवर शेकडो जातीच्या रान फुलांचे ताटवे फुलविण्याची योजना जिल्हा परिषदेने तयार केली असून या करता मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम. गोंदावले यांनी पुढाकार घेतला आहे. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

म्हैसमाळ सह्याद्री पर्वतरांगाचा सर्वात पूर्वेकडील भाग आहे. या परिसरात सुंदर पर्वतरांग असून विस्तीर्ण पठार आहे. पावसाळ्यात पावसाच्या सरीनंतर दाट धुके पसरते. पावसाच्या नियमित हजेरी मुळे हा संपूर्ण परिसर हिरवा गार होवून जातो. हळुवार वाहणार वारे, मनमोहक व्हू पॉईंटस, घनदाट वृक्षवल्ली, नागमोडी पाऊलवाट या ठिकाणचा परिसर हा एखाद्या चित्राप्रमाणे भासतो. येथील कमाल तापमान ३४ अंश तर किमान तापमान साधारपणे ७ अंशांपर्यंत खाली जाते. या ठिकाणचा बहुतांश भाग हा वन विभागाच्या मालकीचा असून या विभागाने वनपर्यटनाचा हेतू समोर ठेवून सुनियोजित विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जिल्हा परिषदेने या ठिकाणाचे महत्व लक्षात घेवून येणाऱ्या पर्यटकाच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी शेकडो जातीचे रान फुलांचे ताटवे या ठिकाणच्या पठार व डोंगर दऱ्या मध्ये फुलविण्याचा निर्णय घेतला आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जिल्हा परिषदेमार्फत टास्क फोर्स तयार करण्यात आला असून यामध्ये वन विभाग, पर्यटन विभाग विद्यापीठातील या विषयातील तज्ञ मंडळी यांची समिती गठीत करण्यात येत आहे. म्हैसमाळ, सुलीभंजन, सारोळा हि पर्यटन स्थळे या करता निवडण्यात आली आहेत. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad tourist destinations developed Based on Cas Plateau