तो भावाच्या लग्नाला गावी निघाला, वाटेतच काळाने घाला घातला,

accident.jpg
accident.jpg

आडुळ (औरंगाबाद) : मोठ्या भावाच्या लग्नासाठी गावी येत असलेल्या तरुणाच्या दुचाकीला पाठीमागुन भरधाव वेगाने येणारया अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना शनिवारी (ता.१५) रोजी राञी साडे नऊ वाजेच्या सुमारास औरंगाबाद-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल महाराष्ट्र समोर घडली.

भरत संतोष पवार (वय २५ वर्षे) रा. मुंकुदनगर, मुंकदवाडी औरंगाबाद या तरुणाचा मोठा भाऊ लग्नासाठी कुटुंबासह ब्राम्हणगाव येथील एका मुलीला बघण्यासाठी आले होते. मुलगी पसंत पडल्यानंतर लग्न लगेच रविवारी करण्याचे ठरले. यासाठी त्याचे कुटुंबिय लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी अंबड येथे गेले. लग्न ठरल्याची माहिती भरत याला देण्यात आली. 

त्यामुळे भरत शनिवारी रात्रीच औरंगाबाद येथुन लग्नासाठी कपडे व इतर अवश्यक साहित्य खरेदी करुन दुचाकी क्रमांक एमएच २० एएफ ३७८६ ने अंबडला जाण्यासाठी निघाला. दुचाकी आडुळ शिवारात येताच दुचाकीला पाठीमागुन येणारया अज्ञात वाहनाने जोराची धडक देवुन तब्बल शंभर ते दिडशे फुटापर्यंत फरफटत नेले. पाऊस सुरु असल्याने महामार्गावर कोणीच नव्हते. त्यामुळे या दुचाकीला उडविणारा वाहनधारक वाहनासह घटनास्थळावरुन फरार झाला. 

यानंतर सदरील मृतदेहावरुन दुसरेही तिन चार वाहने गेली. त्यामुळे मृतदेह छिन्नविछिन्न झाला होता. अपघाताची माहिती मिळताच आडुळ येथील ग्रामस्थांनी आयआरबी कंपनीच्या रुग्णवाहिकेला कॉल करताच रुग्णवाहिकेचे विजय धारकर, विठ्ठल गायकवाड, चालक आत्माराम गाडेकर यांनी मृतदेह आडुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. येथील वैद्यकिय अधिकारी निलकंठ चव्हाण यांनी तपासुन मयत घोषित केले. या अपघाताची नोंद पाचोड पोलिस ठाण्यात घेण्यात आली. पुढील तपास ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार सुधीर ओव्हळ, फेरोज बरडे करीत आहेत.

म्हणून बनला मृत्युचा सापळा 
ज्या ठिकाणी हा अपघात झाला तेथुन पांढरी गावाकडे जाण्यासाठी मधोमध सोडलेला रस्ता (चैनेज नंबर २७४) हा वाहन धारकासांठी मृत्युचा सापळा बनला आहे. या ठिकाणी गेल्या दोन वर्षात अनेक अपघात झाले असुन यात अनेक वाहनधारकांना आपला जिव गमवावा लागला. अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. त्यामुळे सोडलेले हे दुभाजक बंद करावे अशी मागणी वाहन धारकातुन होत आहे.

Edited By Pratap Awachar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com