ब्रिटनमधील भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीला धावला औरंगाबादचा तरुण 

file photo
file photo

औरंगाबाद : जगभरात ‘कोरोना’ विषाणूने (Covid-१९) थैमान घातले आहे. ब्रिटनमध्येही परिस्थिती चिंताजनक आहे. या ठिकाणी अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमर फारुकी यांनी पुढाकार घेतला आहे. ते सध्या शिक्षणानिमित्त ब्रिटनमध्ये असून, मूळचे औरंगाबादचे आहेत. 

उमर फारुकी हे ब्रिटनमधील सेंट्रल लँकशायर विद्यापीठात बॅरिस्टरचे शिक्षण घेत आहेत. लंडनमध्ये शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर भारतीय विद्यार्थी आहेत. ब्रिटनमध्ये तर ‘कोरोना’ने कहर माजवला आहे. या बिकट स्थितीत फारुकी स्वत: व त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेत आहेत; पण तिथे अडकलेल्या हजारो भारतीयांचीसुद्धा काळजी घेत आहेत. त्यासाठी ते ब्रिटिश सरकारकडे सतत पाठपुरावा करीत आहेत. 

औरंगाबादच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना भारतीय चलनामुळे अडचण येत आहे. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांची जेवण आणि निवासाची व्यवस्था मोफत करावी. कोणत्याही प्रकारे भाडेकरू असलेल्या विद्यार्थ्यांना तीन महिने कोणतेही शुल्क आकारू नये. घरमालकांनीही त्यांना रूम सोडण्यास सांगू नये, अशी मागणीही त्यांनी ब्रिटन सरकारकडे पत्राद्वारे केली आहे. 

मराठवाड्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी - क्लिक करा

उमर फारुकी म्हणाले की, मी कुटुंबासोबतच ब्रिटनमध्ये आहे. या शहरात अनेक भारतीय विद्यार्थी आहेत. त्यांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्या अडचणी जाणून घेत त्या सोडविण्यासाठी सातत्याने ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. ब्रिटन सरकारतर्फे व भारतीय दूतावासातर्फे आम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे प्रश्न लवकर सुटतील अशा पद्धतीने आम्ही पाठपुरावा करीत आहोत, असेही फारुकी यांनी सांगितले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com