तेजस्विनी केंद्रे ठरली औरंगाबादची युवावक्ता

Aurangabad Yuvavakta Tejaswini Kendre
Aurangabad Yuvavakta Tejaswini Kendre

औरंगाबाद : मराठवाड्याचा युवावक्ता आंतरमहाविद्यालयीन वक्‍तृत्व स्पर्धेत शिवछत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थीनी तेजस्विनी केंद्रे हीने प्रथम क्रमांक पटकावला. औरंगाबाद जिल्ह्याचा युवावक्ता होण्याचा बहूमान तिने मिळवला. देवगिरी महाविद्यालयाची विद्यार्थिनी पोर्णिमा तोटेवाड हिने द्वितीय तर, मौलाना आझाद महाविद्यालयाचा विद्यार्थी शेख इरफान याने तृतीय क्रमांक पटकावला.

खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार सतीश चव्हाण यांच्यातर्फे मराठवाड्याचा युवावक्‍ता ही स्पर्धा घेण्यात येते. देवगिरी महाविद्यालयातील रविंद्रनाथ टागोर सभागृहात सोमवारी (ता. 6) आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेतील औरंगाबाद जिल्हानिहाय फेरी झाली.

स्पर्धेचे उद्‌घाटन सामाजिक कार्यकर्त्या मंगल खिवंसरा यांच्या हस्ते झाले. व्यासपीठावर देवगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे, उपप्राचार्य डॉ. अनिल आर्दड, उपप्राचार्य डॉ. सी. एस. पाटील, संयोजक डॉ. दिलीप खैरनार, रामेश्वर कदम यांची उपस्थिती होती.

मंगल खिवंसरा म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी वास्तावाचे भान ठेवून निडर बनायला शिकले पाहिजे. आपल्याकडे सत्यता असेल तर भय बाळगायची गरज पडत नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याकडे विविध कौशल्य असली पाहिजेत. डॉ. थोरे म्हणाले, आतून जे बोलले जाते तेच चिरकाळ टिकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून बोलले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी अवातंर वाचन करणे गरजेचे आहे.

पारितोषिक वितरण मशिप्र मंडळाचे प्रशासकीय अधिकारी प्रा. एफ. जी. माळी, उपप्रशासकीय अधिकारी डॉ. पी. आर. थोटे, देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्यातीलविविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धकांनी भय इथले संपत नाही, ब्रेकिंगच्या गदारोळात पत्रकारितेची हत्या, मराठवाड्याचा अनुशेष विकासाचा की नेतृत्वाचा?, ऑनलाईन सुखाच्या शोधात माणूसच ऑफलाईन या विषयावर अभ्यासपूर्ण मते मांडली. स्पर्धेचे परिक्षण नम्रता फलके, डॉ. वैजनाथ कदम, डॉ. रमेश औताडे यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com