अब्दुल सत्तार गद्दार, मातोश्रीची पायरी चढू देऊ नका : चंद्रकांत खैरे : Video

प्रकाश बनकर
Saturday, 4 January 2020

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणुक झाली. यात डोणगावकर आणि शेळके यांना 30 समसमान मते पडली. यात चिट्टी काढून अध्यक्ष निवडण्यात आला. यात अध्यक्ष मिना शेळके यांचे नशीब उजळले. या निवडीनंतर चंद्रकांत खैरे यांनी भाजपच्या उपाध्यक्ष झाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. केवळ राज्यमंत्री अब्दुल सत्तारांमूळेच भाजपचा उपाध्यक्ष झाला. सत्तारांनी गद्दारी केल्यामूळे हे घडले.

औरंगाबाद : ''अब्दुल सत्तार गद्दार आहेत. त्यांनी शेवटी रंग दाखवलेच. अशा गद्दाराला पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नका,'' अशा शब्दांत शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी हल्ला चढवला आहे. 

औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदासाठी शनिवारी (ता.4) निवडणुक झाली. यामध्ये महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या मिना शेळके या अध्यक्ष झाल्या, तर उपाध्यक्षपदी भाजपचे लहानू गायकवाड यांची निवड झाली.

या निवडणुकीत शिवसेनेच्या विद्यामान अध्यक्षा ऍड. देवयानी डोणगावकर यांनी बंडखोरी करीत अब्दुल सत्तार, आणि भाजपच्या साह्याने अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता. यात डोणगावकर आणि शेळके यांना 30 समसमान मते पडली. यात चिठ्ठी काढून अध्यक्ष निवडण्यात आला. यात सत्तार यांचे प्रयत्न फोल ठरले आणि मिना शेळके यांचे नशीब उजळले. 

Image may contain: 6 people, people smiling, people standing and indoor
नवनिर्वाचित अध्यक्षा मीना शेळके

या निवडीनंतर चंद्रकांत खैरे यांनी भाजपचा उपाध्यक्ष झाल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली. केवळ अब्दुल सत्तारांमुळेच भाजपचा उपाध्यक्ष झाला. सत्तारांनी गद्दारी केल्यामुळेच हे घडले, असे सांगत खैरे म्हणाले, ''महाविकास आघाडीचा अध्यक्ष झाला. हे शिवेसेनेचे मोठे यश आहे. ज्यांनी बंडखोरी केली, त्यांना परमेश्‍वराने घरी पाठविले. त्यांच्यावर शिवसेना कारवाई करेल.''

वाचा - संजय राऊत काय म्हणाले?

''सत्तारांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. त्यांनी मला सांगितले, की मी उद्धव साहेबांसमोर राजीनामा फेकला. अशा गद्दारांना शिवसेना माहित नाही. सहा लोक घेऊन तो भाजपकडे कसा गेला? आज तो महाविकास आघाडीचा मंत्री आहे. मग भाजकडे जा. परत राजीनामा देत निवडुन ये. ताकत असेल तर निवडुन ये. मी साहेबांना सांगितले. कारवाई करा म्हणून. असे गद्दार घेऊन काय फायदा?''

''आमच्या शिवसेनेमुळे तो निवडुन आला. शिवसेना आम्ही कष्टाने बांधलेली आहे. 1986 पासून काम करत आहे. आम्ही कष्टाने शिवसेना उभी केली, तो कोण आयता टिकोजी आला? मी स्वत: उद्धव ठाकरे यांना सांगेल, सत्तारांना हाकलुन द्या. पवित्र मातोश्रीची पायरी चढू देऊ नका,'' अशा शब्दांत चंद्रकांत खैरे यांनी संताप व्यक्त केला. 

उद्या मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहे

उद्याच सत्तारांविषयी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुखांना भेटणार व या गद्दाराला पवित्र मातोश्रीची पायरी चढु देऊ नका, असे सांगणार असल्याचे खैरे म्हणाले. ''त्या डोणगावकर बाईंना पक्षात घेतले. तिकिट दिले. निवडुनही आणले. एवढे काय तर अध्यक्षही केले. तरीही लगेच दुसरीकडे केले. आम्ही काय नुसता या लोकांसाठी पक्ष वाढवत राहयचे का,'' असेही खैरे म्हणाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad News Abdul sattar Chandrakant Khaire Shivsena Breking News