शुक्रवारची स्थायी समितीची सभा रंगणार या विषयावरुन !  

दुर्गादास रणनवरे
Wednesday, 16 September 2020

डॉ. उल्हास गंडाळ, सुनील चांदवडकर प्रकरणावरून प्रशासनाची परीक्षा?

औरंगाबाद : जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा शुक्रवारी (ता.१८) दुपारी ०१ वाजता जिल्हा परिषद मुख्यालयातील यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती  जिल्हा परिषद अध्यक्षा तथा स्थायी समितीच्या सभापती तसेच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा स्थायी समितीचे सचिव शिरीष बनसोडे यांनी दिली. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या सभेमध्ये विविध महत्वपूर्ण  विषयांवर चर्चा केली जाणार आहे . त्यामध्ये मागील स्थायी समितीची सभा २१ ऑगस्ट रोजी झाली होती त्या सभेचे इतिवृत्तांत वाचून कायम करणे तसेच सन २०१९ - २०२० या वर्षातील  वार्षिक प्रशासन अहवालातील प्रकरण २, ५ अ आणि पाच क ला मान्यता मिळणे बाबत तसेच २०१९ -२०२० या आर्थिक वर्षाच्या ग्रामपंचायतीच्या वार्षिक प्रशासन अहवालास मान्यता देणेबाबत या स्थायी समितीमध्ये ठराव मांडण्यात येणार आहेत.  तसेच सभापती यांच्या मान्यतेने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयावर देखील स्थायी समितीमध्ये चर्चा केली जाणार असल्याचे त्याच्या केली जाणार आहे. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आरोग्य विभाग, पंचायत विभाग पदाधिकऱ्यांचा रडारवर ?
जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ आणि पिसादेवी येथील ग्रामपंचायतीवर नियुक्ती मिळविलेले वादग्रस्त प्रशासक तथा बान्धकाम विभागातील शाखा अभियंता सुनील चांदवडकर यांच्या प्रकरणावरून तसेच शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागासह अन्य प्रश्नांवरुनही स्थ्यायी समितीच्या सभेत सदस्यांकडून प्रशासनाला जाब विचारला जाणार असल्याचे एका स्थ्यायी समिती सदस्याने "सकाळ' शी बोलतांना सांगितले.

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

पिसादेवी येथील ग्रामपंचायतीचा पदभार देतांना पंचायत विभागातील उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील भोकरे यांना संबंधित प्रशासक म्हणून नियुक्त केलेल्या चांदवडकर यांचे आरोपाची खरोखरच माहिती नव्हती काय ? स्थळ पाहणी कोणत्या अधिकाऱ्याने केली होती ? माहिती नव्हती तर स्थळ पाहणी करून वादग्रस्त कामाचे बिल कुणी रोखले होते ?  भ्रष्टाचार प्रकरण माहित होते तर नियुक्ती कुणी दिली ? आदी प्रश्न विचारण्यात येणार असल्याचेहि या सदस्याने सकाळ शी बोलतांना सांगितले. तसेच आरोग्य विभागातील विविध प्रश्न, खरेदी केलेल्या साहित्याची आणि टेंडरची माहिती तसेच डॉ. उल्हास गंडाळ यांच्याकडून पदाधिकरी आणि सदस्यांना कोरोनाविषयी माहिती न  देणे आदी विषयांवर प्रशासनाला धारेवर धरले जाणार असलायचेही या सदस्याने स्पष्ट केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad Zilla Parishad Standing Comitee news