Corona-virus : मिनी मंत्रालयात सन्नाटा…

दुर्गादास रणनवरे
Thursday, 6 August 2020

जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तसेच वित्त विभागातील आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाने संपूर्ण जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालय (अत्यावश्यक सेवा वगळून) बुधवार (ता ५) ते शुक्रवार (ता ७) तीन दिवस सर्व दिवस जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, सर्व कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

औरंगाबाद  : शहराची वाटचाल ‘अनलॉक’च्या दिशेने सुरू असताना मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात मात्र तीन दिवस (अत्यावश्यक सेवा वगळून) कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. पंचायत विभागातील एका अधिकाऱ्याला तसेच वित्त विभागातील काही कर्मचारी आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

 

माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे निधन

त्यामुळे आरोग्य विभाग वगळता सर्वच विभागांना कुलूप लावल्याचे दिसून आले. या तीन दिवसात परिसरात तसेच कार्यालयात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी मंगळवारी तसे आदेश जारी केले होते. एरवी मोठ्या गर्दीने भरलेले जिल्हा परिषद मुख्यालयात मात्र बुधवारी सामसूम दिसून आले.

लाखोंचे पॅकेज नाकारुन अंकिताने देशसेवेसाठी ‘यूपीएससी’त मिळविले यश  

  
जिल्हा परिषदेतील पंचायत विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला तसेच वित्त विभागातील आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे प्रशासनाने संपूर्ण जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालय (अत्यावश्यक सेवा वगळून) बुधवार (ता ५) ते शुक्रवार (ता ७) तीन दिवस सर्व दिवस जिल्हा परिषदेतील सर्व विभाग, सर्व कार्यालय अत्यावश्यक सेवा वगळून बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचेशी चर्चा करून बुधवार ते शुक्रवार तीन दिवस जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालय (अत्यावश्यक सेवा वगळून) बंद ठेवण्याचे आदेश मंगळवारी (ता.०४) निर्गमित केले आहेत.

पाच वेळा अपयश आलं; तरीही पठ्ठ्याने जिद्दीने कलेक्टरच स्वप्न साकारलं  

जिल्हा परिषद कार्यालय बंद ठेवण्यात आल्यामुळे बुधवारी (ता. ०५) जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात जंतू नाशक फवारणी करण्यात आली. कोरोना विषाणूची साखळी तोडण्या करिता तीन दिवस संपूर्ण कार्यालय बंद ठेवण्यात येत असले तरीही या कालावधीमध्ये सर्व खातेप्रमुख व कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम या संकल्पनेनुसार दैनंदिन कामकाज करणे आवश्यक राहील असेही आदेश डॉ. गोंदावले यांनी काढले आहेत. 

राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा  

परंतु या आदेशाचे पालन अधिकारी कर्मचारी खरोखरच करणार आहेत कि नाही हा भाग  अलहिदा. मात्र या तीन दिवस बंदमुळे कोरोनाची साखळी तुटण्यास नक्कीच मदत  होईल यात शंका नाही.

Edit-Pratap Awachar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Aurangabad ZP office three days closed