एनएसयुआयचा विद्यापीठात निशब्द निषेध 

एनएसयुआयचा विद्यापीठात निशब्द निषेध 

औरंगाबाद : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता.सहा) औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात एनएसयूआयतर्फे निशब्द निषेध नोंदवण्यात आला. 

विद्यापीठातील वाय कॉर्नरवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सकाळी सुरु झाले होते. आंदोलनात जिल्हाध्यक्ष मोहित जाधव, विद्यापीठ अध्यक्ष योगेश बहादुरे, आनंद मगरे, विठ्ठल पाटील, संदीप दांडगे, भूषण खंदारे, रोहन निकाळजे, अभिषेक कुलकर्णी, धीरज ठाकूर, दिग्विजय शिंदे अक्षर जेवरीकर, विष्णू शेटे, आकाश गुनावत, निलेश काळे, निलेश अंबेवाडीकर आदींची उपस्थिती होती.

"वारंवार या देशात विद्यार्थी, शिक्षकांवर हल्ले होत आहे. यापुढेही असेच सुरु राहिले तर, एबीव्हीपी ला जशास तसे उत्तर दिले जाईल असे एनएसयुआयचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष मोहित जाधव म्हणाले. 

विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखले 

दिल्लीमधील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी (ता. सहा) इतर विद्यार्थी संघटनांच्या विद्यार्थ्यांनी रास्ता रोको केला. एबीव्हीपी, आरएसएस विरोधात नारे लावत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर विद्यार्थी रस्त्यावरच बसले आहेत. 

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर पोहोचल्यानंतर महात्मा फुले यांच्या पुतळ्यास समोर बसून विद्यार्थी निषेध नोंदवणार होते. मात्र, पोलिसांनी विद्यार्थ्यांना आत जाण्यापासून रोखले.

त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यावर तोडगा म्हणून विद्यार्थ्यांनी मुख्य इमारतीसमोरील रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. "स्टॅंड विथ जेएनयू, एबीव्हीपी मुर्दाबाद' अशाप्रकारचे फलक घेऊन निषेध नोंदवला जात आहे.

विद्यापीठासमोर सुरु असलेल्या आंदोलनात विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी भाषण करत आहेत. एसएफआय आंदोलनाचे नेतृत्व करत आहे.

आंदोलनात एनएसयुआय, एमआयएमची विद्यार्थी आघाडी, रिपब्लिकन विद्यार्थी सेना, पॅंथर रिपब्लिकन विद्यार्थी आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन, स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन, समता विकास आघाडी, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, एआयएसएफ, सत्यशोधक विद्यार्थी संघटना यांचा सहभाग आहे. याठिकाणी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांचा मोठा फौजफाटा आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com