औरंगाबादेत भाजप कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, भगवान महासंघाचे कार्यकर्ते अटक

भगवान महासंध.jpg
भगवान महासंध.jpg

औरंगाबाद : अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी योग्य दिशेने काम करणाऱ्या मुंबई पोलिसांची भाजपने बदनामी केल्याचा आरोप करीत जय भगवान महासंघाकडून येथील भाजप कार्यालयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असताना सुरक्षा व्यवस्था तोडून दोघांनी कार्यालयावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
 


चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपुताच्या मृत्युप्रकरणी मुंबई पोलिस योग्य रितीने तपास करत असताना भाजपने मुंबई पोलिसांची बदनामी केली. या प्रकरणावरून जय भगवान महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या नेतृत्वात मंगळवारी (ता.०६) आंदोलन करण्यात येणार होते.

मात्र आंदोलनापूर्वी भाजपच्या उस्मानपुरा येथील कार्यालयाभोवती मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तरीही जय भगवान महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष सचिन डोईफोडे, जिल्हाध्यक्ष योगेश खाडे यांनी सुरक्षा व्यवस्था पार करत भाजप कार्यालयावर दगडफेक करून फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र वेदांतनगर पोलिसांनी त्यांना त्वरित ताब्यात घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com