द्विधा व्यक्तिमत्वाबाबत निराश आहात? चिंता सोडा, हे वाचा

मनोज साखरे
मंगळवार, 7 जानेवारी 2020

मी कसा होतो, कसा होत आहे, आता लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, या नैराश्‍यात गढून जाण्याची वृत्ती वाढीस लागत आहे. नैराश्‍याच्या टोकावर असताना माणूस आत्महत्या करतो.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सुवर्णपदक मिळविणाऱ्या डॉक्‍टरने तीन प्रकारची इंजेक्शन्स टोचून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. 6) उघडकीस आली. अत्यंत हुशार डॉक्‍टर तरुणाकडून झालेला हा प्रकार हादरून टाकणाराच.

बायपोलार डिसऑर्डर आणि सोशल एन्झायटीमुळे त्यांनी आत्महत्या करीत असल्याचा चिठ्ठीत उल्लेख केला. बायपोलार मूड व सोशल एन्झायटीतून नकारात्मकता वाढीस लागत असल्याने आत्महत्येकडे लोक वळत आहेत. काय आहे हे... 

स्वत:ची दोनध्रुवीय स्थिती जेव्हा होते, तेव्हा एक टोक सकारात्मकतेचे तर दुसरे नैराश्‍याचे असते. सोबतच कमकुवतपणा अतिवाढीस लागतो, स्वत:ला दोष दिला जातो, चुका शोधल्या जातात, तेव्हा नकारात्मक विचार वाढतात.

मी कसा होतो, कसा होत आहे, आता लोक काय म्हणतील, जग काय म्हणेल, या नैराश्‍यात गढून जाण्याची वृत्ती वाढीस लागत आहे. नैराश्‍याच्या टोकावर असताना माणूस आत्महत्या करतो.

अशाच काहीशा विचारांतून घाटीतील तरुण डॉक्‍टरने आत्महत्या केली. त्यांनी चिठ्ठीतही बायोपोलार व सोशल एन्झायटीची बाब नमूद केली. या दोन्ही समस्या डॉक्‍टरच्या आत्महत्येनंतर समोर आल्या आहेत.

बाप रे - तीन प्रकारचे इंजेक्शन्स टोचून घेत गोल्ड मेडलिस्ट डॉक्टरची आत्महत्या

अनेकजण या आजाराने ग्रासतात; परंतु समुपदेशन आणि औषधी तसेच सकारात्मक विचारांच्या बळावर यावर नियंत्रण मिळविता येऊ शकते. विशेष म्हणजे असं अनेकांच्या बाबतीत होऊ शकतं ती माणसं मनानं भक्कम आणि कच खाणारे नसतात. त्यांनी स्व:त्वाचा सकारात्मक शोध घेतला तरीही सर्व काही ठिक होतं. 

काय आहे बायपोलार? 

बायपोलार म्हणजे दोन टोक. दोनध्रुवीय स्थितीला बायोपोलार म्हणू शकता. (उदा. आता राजा, दुसऱ्या मिनिटाला शिपाई अशी मनःस्थिती) एकाचवेळी स्वत:ला पॉझिटिव्ह दाखविणे व काहीवेळा स्वत:ला बिनकामाचा ठरविणे ही बायोपोलारची स्थिती आहे. स्वभाव व विचारांत खूप वेगळेपण असते. एकदा खूप चांगला, सकारात्मक व भोवतालची परिस्थिती छान वाटते; पण दुसऱ्याच वेळी मी कुणाच्या कामाचा नाही, उपयोगाचा नाही असे समजणे. स्वत:ला निरुपयोगी समजणे व ते सतत गृहीत धरणे. 

यामुळे सोशल एन्झायटी 

ज्यांची अंतर्गत श्रद्धास्थाने काळानुरूप बदलत नाहीत, ते लोक सामाजिकदृष्ट्या मागे पडतात. त्यांना समायोजन करणे अवघड जाते. समाज काय म्हणेल? या चिंतेने ते ग्रासतात व नंतर नकारात्मक विचार आणून जीवनयात्रा संपवितात. 

हे आहेत उपचार... 
बायोपोलार व सोशल एन्झायटीवर उपचारांसाठी साधी औषधी आहेत. ती घेतली तरीही नियंत्रण मिळविता येते. समुपदेशकाकडे रिलॅक्‍सेशन थेरपी घेतली व प्रॉपर समुपदेशन घेतले तर हा आजार दूर होतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

हेही वाचा -  

Exclusive : पुण्याचा पोलिस देऊ शकतो निर्भयाच्या बलात्काऱ्यांना फाशी 

कैद्याला एकदम लटकवत नाहीत फासावर, अशी असते पूर्वतयारी 

नसोपचार तज्ज्ञ तथा समुपदेशक 
डॉ. संदीप सिसोदे सांगतात... 

  1. स्वत्वाचा शोध घ्या 
  2. श्रद्धास्थान बदलणे, इतरांच्या बोलण्यावर, त्यांच्या विचारांवर व वर्तनावर आपले जीवन अवलंबून नाही. 
  3. इतरांनी आपल्याबद्दलचा दृष्टिकोन कुणी सांगितला तर तो शंभर टक्के बरोबर व स्वत:चा स्वत:बद्दलचा विचार चूक असे आपण ठरवतो, हे चुकीचे आहे. 
  4. इतरांनी काय बोलावे, काय ठरवावे हे त्यांचे मत आहे, ते जसे ठरवतील तसे आपण असतोच असे नाही. 
  5. स्वत:बद्दलची काळजी घ्या, स्वत:वर प्रेम करा. 
  6. स्वत:च्या गुणांसोबत सामान्य राहा. 
  7. डिप्रेसिव्हनेस, न्यूनगंड, अपराधी भावना सोडून द्या.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bipolar Mood And Social Anxiety Aurangabad News Psychology News