
सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ सहविचार सभा
औरंगाबाद : महाविकास आघाडी महिन्या-दोन महिन्यात पडणार असे भाकीत करण्याचा भाजप पदाधिकाऱ्यांना छंद लागला आहे, असा टोला मारीत सरकार केवळ पाच वर्षच नव्हे तर २५ वर्षांपर्यंत टिकेल, असा विश्वास कौशल्य विकास व उद्योजकतामंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!
महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ नवखंडा महाविद्यालयात शनिवारी (ता. २८) सहविचार सभेत ते बोलत होते.
मलिक म्हणाले, ‘‘पदवीधर मतदान प्रक्रिया इतर निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. यात निवडणूक आयोगाने पुरविलेल्या पेननेच पसंतीचे क्रमांक नमूद करायचे आहे. मतपत्रिका फोल्ड करताना उभी फोल्ड करावी अन्यथा मत अवैध ठरू शकते.’’
औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
सतीश चव्हाण म्हणाले, मतदार चाणाक्ष आहे, तो पक्ष किंवा चेहरा बघून मतदान करीत नाही. ८० टक्के मतदार उमेदवाराचे काम बघून मत टाकतात. आपली दखल मतदार घेतील.
देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
संवाद मेळावे
युवा सेनेचे महाविद्यालय कक्ष प्रमुख ऋषीकेश जैस्वाल यांच्या संयोजनात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात विजय संकल्प मेळावा झाला. यावेळी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी सतीश चव्हाण हे यंदा हॅट्रिक साधणारच असा विश्वास व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, युवा सेना, तसेच विद्यार्थी काँग्रेसतर्फे युवासंवाद मेळावा शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. शहागंज येथील गांधी भवनात शहराध्यक्ष काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संवाद मेळावा झाला. यावेळी माजी मंत्री अनिल पटेल यांची उपस्थिती होती.