भाजपच्या इच्छुकांनी लावली फिल्डिंग

Bjp News Aurangabad
Bjp News Aurangabad

औरंगाबाद : भाजपच्या शहर व जिल्हा कार्यकारिणी निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात वेगवेगळ्या पदांसाठीही निवड होणार आहे. यासाठी इच्छुकांनी शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांकडे फिल्डिंग लावली आहे. आठवड्याभरात ही कार्यकारिणी जाहीर होणार आहे. यात नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार का, याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. 


भाजपची जानेवारीत शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षाची निवड करण्यात आली. मात्र उर्वरित कार्यकारिणीच्या नियुक्त्या गेल्या सहा महिन्यांपासून रखडल्या होत्या. प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक हे संघटनात्मक कामानिमित्ताने नुकतेच शहरात आले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकारिणी निवडीसंदर्भात शहराध्यक्षांसोबत चर्चा केली व त्यानंतर या निवडीबाबत प्रक्रिया गतीने सुरू झाली. परंतु कोरोनामुळे प्रक्रिया थंडावली होती. ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. 

  इच्छुकांची भेटीगाठी
अनलॉक सुरू होताच कार्यकारिणी निवड प्रक्रियेला वेग आला. शहराध्यक्ष केणेकर, जिल्हाध्यक्ष औताडे हे कामाला लागले असून केणेकर यांनी तर यासंदर्भात कार्यकर्त्यांना एक पत्र पाठविले आहे. तर दुसरीकडे कार्यकारिणीवर वर्णी लागावी, महत्त्वाचे पद पदरात पडावे, यासाठी इच्छुकही आपआपल्या परीने कामाला लागले आहेत. यासाठी भेटीगाठी, फोनाफोनीवर भर दिला जात असून काहींनी तर थेट श्रेष्ठींसह प्रदेश स्तरावरील नेत्यांचे आशीर्वाद मिळविले आहेत. कार्यकारिणीवर आपल्या मतदारसंघातील, विश्वासू समर्थकांची वर्णी लागावी, यासाठी शहर व जिल्ह्यातील नेते, पदाधिकारी हालचाली करीत आहेत.

कार्यकारिणी निवडीत सर्वसमावेशकता आणण्यासाठी माझा पहिला प्रयत्न राहणार आहे. कार्यकारिणीत काम करण्याची प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेत कोअर कमिटीच्या बैठकीत इच्छुकांच्या नावावर चर्चा होऊन आठवडाभरात कार्यकारिणी जाहीर होईल. 
- संजय केणेकर, शहराध्यक्ष, भाजप 

नव्या कार्यकारिणीत जिल्ह्यात प्रामाणिकपणाने काम करणाऱ्यांना संधी देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे.                 -विजय औताडे, जिल्हाध्यक्ष, भाजप 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com