जिल्हा परिषदेतील आघाडी फोडण्याच्या भाजपच्या हालचाली

प्रकाश बनकर
Tuesday, 31 December 2019

अडीच वर्षे सत्तेपासून दूर रहिलेल्या भाजपला ही नामी संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता मिळण्यासाठी भाजपतर्फे कॉंग्रेस सदस्यांशी संपर्क साधण्यात येत आहे.

औरंगाबाद: जिल्हा परिषदेत शिवसेना-कॉंग्रेसच्या महाआघाडीत बिघाडी झाली आहे. ठरल्याप्रमाणे कॉंग्रेसने शिवसेनेला अध्यक्ष आणि प्रमुख सभापतिपदे दिली; मात्र आता अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर शिवसेना अध्यक्षपदावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

यातच अडीच वर्षे सत्तेपासून दूर रहिलेल्या भाजपला ही नामी संधी मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची सत्ता मिळण्यासाठी भाजपतर्फे कॉंग्रेस सदस्यांशी संपर्क साधण्यात येत आहे. कॉंग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे आमच्या संपर्कात असल्याचे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. 

हेही वाचा : मोदी म्हणजे हिटलरचाच पुनर्जन्म - जितेंद्र आव्हाड

3 जानेवारील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक

जिल्हा परिषदेत भाजपला सर्वाधिक 23 जागा मिळाल्या आहेत; मात्र तरीही त्यांना सत्ता मिळविता आली नाही. तर दुसरीकडे शिवसेनेने कॉंग्रेसला सोबत घेत जिल्हा परिषदेतून भाजपला दूर ठेवले होते. यासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला ठरला होता. 3 जानेवारील जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणुक होणार आहे. तत्कालीन कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल सत्तार यांच्या मदतीनेही सत्ता स्थापन करण्यात आली होती.

हेही वाचा : महाविकास आघाडीच्या नेत्यांचे शेतकरीप्रेम पुतणा मावशीचे - मेटे 

शिवसेना पुन्हा जिल्हा परिषदेवर दावा

आता सत्तार शिवसेनेत असल्याने शिवसेना पुन्हा जिल्हा परिषदेवर दावा सांगत आहे; मात्र याला कॉंग्रेस व काही सत्तार समर्थकांनी विरोध दर्शविला आहे. एवढेच नव्हे, तर कॉंग्रेसच्या सदस्यांनी नाराजी दर्शवीत शिवसेनेच्या विरोधात जाण्याची तयारी दाखवली असल्याने येत्या दोन जानेवारीला काय बदल होते, हे पाहणे गरजेचे ठरणार आहे. 

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

कॉंग्रेसच्या सदस्यांशी  बोलणी सुरू
दरम्यान, डॉ. कराड म्हणाले, की आमचे जिल्हा परिषदेत सर्वाधिक सदस्य आहेत. शिवसेनेने अभद्र आघाडी करीत जिल्हा परिषदेची सत्ता मिळविली; मात्र शिवसेना केवळ सत्तेसाठी काहीही करू शकते, याची प्रचिती आता कॉंग्रेसला येत आहे. म्हणून कॉंग्रेसच्या सदस्यांशी आमची बोलणी सुरू आहेत. माजी आमदार कल्याण काळे यांच्याशी सातत्याने संपर्कात असल्याची माहिती कराड यांनी दिली.

हेही वाचा - भाकरीचे पीठ संपले अन सुरेखाच्या आयुष्याचा दोरही तुटला! हृदयद्रावक...

जिल्हा परिषदेत अशी आहे स्थिती 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP Try Divde Zilha Parishad Aghadi


शिवसेना 18 सदस्य 
कॉंग्रेस  16 सदस्य 
भाजप  23 सदस्य
मनसे  1 सदस्य 
रिपांइं (डेमोक्रॅटिक)  1 सदस्य 
अपक्ष  3 सदस्य 
एकूण   62 सदस्य