AAROPI.jpg
AAROPI.jpg

औरंगाबाद : भाऊ-भाऊजी आले, चहा पान झाले, कॅरम ही खेळला अन त्यांनी बहीण-भावाचाच गळा चिरला..

औरंगाबाद : दुपारी बारा वाजता ते औरंगाबादेत दाखल झाले. त्यानंतर ते मयताच्या घरी गेले. पाहुणेच ना ते म्हणून भाऊ-भाऊजींचे स्वागत ही झाले. चहापान झाला, कॅरम ही खेळला. अन् त्या दोघांनी किलोभर सोन्यासाठी बहीण भावाचा गळा चिरला. 

लॉकडाउनचे मानगुटी भूत, पुन्हा अफवांना ऊत!   

औरंगाबादेतील बहीण भावाच्या निर्घृण हत्येने शहराला हादरवून टाकले होते. त्या हत्येमागील रहस्य उलघडले असून घरात ठेवलेल्या किलोभर सोन्यासाठी चुलत भाऊ आणि त्याच्या मेहुण्यांणेच ही हत्या केली. 

अशी घडली घटना 

मयत भाऊ बहिणीची आई सकाळीच जालना येथे आल्याचे कळाल्यावर आरोपींनी जालना येथून तीन चाकू विकत घेतले. दुपारी बारा वाजता ते औरंगाबादेत दाखल झाले. त्यानंतर ते मयताच्या घरी गेले. पाहुणेच ना ते म्हणून भाऊ-भाऊजींचे स्वागत झाले. चहापान झाला कॅरम ही खेळला. सायंकाळी पाच वाजे दरम्यान त्या दोन्ही नराधमाने सोळा वर्षाच्या सौरभ खंदाडे-राजपूतला बाथरूम मध्ये नेऊन गळा चिरला. त्याच्या किंचाळण्याचा आवाज आला. आणि वरच्या मजल्यावर असलेल्या किरण हिने ऐकला व ती धावत खाली आली. पाहते तर भाऊ रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. दोन्ही आरोपींनी तिच्यावर हल्ला केला. आणि धारदार चाकूने तिचाही गळा कापला. आणि आरोपी सतीश काळूराम खंदाडे (रा.पाचन वडगाव), अर्जुन देवचंद राजपूत (रा.वैजापूर,) यांनी सोनं घेऊन पळ काढला. 

शहरातील सातारा परिसर भागात गुरुवारी किरण खंदाडे-राजपूत वय-१८, सौरभ खंदाडे-राजपूत वय-१६ यांची राहत्याघरी गळा चिरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी गाठत तपासला सुरुवात केली होती. त्यावेळी घरात चार चहाचे कप पोलिसांना आढळले होते, त्यावरून ओळखीच्या किंवा जवळच्या व्यक्तीनेच ही हत्या केली असावी असा दाट संशय पोलिसांना होता.

त्यावरून पोलिसांनी दोन्ही मयताच्या मोबाईल क्रमांकाची तपासणी सुरु केली. त्यानंतर चुलत भाऊ सतीश आणि त्याचा मेहुणा अर्जुन या दोघांवर पोलिसांना संशय आल्याने दोघांनाही विचारपूस करण्यात आली. विचारपूस दरम्यान दोघेही सुरुवातीला तोंड उघडण्यास तयार नव्हते त्या नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच दोघांनीही गुन्ह्याची कबुली देत ही निर्घृण हत्या घरातील सोन्यासाठी केली असल्याची कबुली दिली.


यांनी लावला शोध...

दोघेही आरोपी सोन्याचे दागिने घेऊन जालण्याकडे रवाना झाले. आरोपी जालना येथून वैजापूरकडे मुद्देमालासह रवाना झाल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर औरंगाबाद येथे सापळा लावून सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम वावळे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना पकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला मुद्देमाल ताब्यात घेतला. ही कामगिरी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना, डॉ. राहुल खाडे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, गीता बागवडे, सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. वावळे, शेख नजीर, सतीश जाधव, चंद्रकांत गवळी, सुधाकर राठोड, सुधाकर मिसाळ , रवी खरात, नितीन देशमुख यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com