esakal | शहराला मिळाले नवीन २३ चार्टर्ड अकाउंटंट; अनिरुद्ध ठोंबरे, पराग सोमाणी प्रथम
sakal

बोलून बातमी शोधा

CA Exam Results News

औरंगाबाद शहरातून अनिरुद्ध ठोंबरे व पराग सोमानीने प्रथम तर, आयुष बोहारा दुसरा आला आहे.

शहराला मिळाले नवीन २३ चार्टर्ड अकाउंटंट; अनिरुद्ध ठोंबरे, पराग सोमाणी प्रथम

sakal_logo
By
प्रकाश बनकर

औरंगाबाद : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) डिसेंबर २०२० घेतलेल्या चार्टर्ड अकाउंटन्सीच्या (सीए) अंतिम परीक्षेचा निकाल सोमवारी (ता.१) जाहीर केला. यात शहरातील २३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. औरंगाबाद शहरातून अनिरुद्ध ठोंबरे व पराग सोमाणीने प्रथम तर, आयुष बोहारा दुसरा आला आहे. पूर्वा साहूजीने तिसरा तर कुणाल मिणियारने ४ था क्रमांक मिळवला असल्याची माहिती सीए असोसिएशनचे औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए गणेश शिलवंत यांनी दिली.


उत्तीर्ण झालेले चार्टर्ड अकाउंटंट
अनिरुद्ध ठोंबरे, पराग सोमाणी, आयुष बोहरा, पूर्वा साहूजी, कुणाल मीनियार, अनुराधा साहूजी, मकरंद शिंपी, प्रीती पाटोडी, प्रतीक देशपांडे,केशव अर्दड, आदिती धूत, प्रतीक्षा कासलीवाल, प्रगती शिंकर, रोशन पांडे, निकिता भवनाणी, ओमकार खोचे, ज्योती राणा, डॉली बोरा, प्रांजल चेचानी, हिना तनेजा, प्रतीक्षा राठी, माधुरी पूल, विकास काळे यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल औरंगाबाद शाखेचे अध्यक्ष सीए गणेश शीलवंत, विकासाचे अध्यक्ष सीए योगेश अग्रवाल यांनी नव्याने पात्रता चार्टर्ड अकाउंटंट्सचे अभिनंदन केले.

संपादन - गणेश पिटेकर